आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाझर तलावासाठी ग्रामस्थांनी केले उपोषण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सरबत देऊन उपाेषण साेडवताना अामदार डाॅ. सतीश पाटील. - Divya Marathi
सरबत देऊन उपाेषण साेडवताना अामदार डाॅ. सतीश पाटील.

पाराेळा / मुंदाणे - तालुक्यातील आडगाव येथे जिल्हा परिषदेंतर्गत मंजूर पाझर तलावाचे काम अपूर्ण अाहे. हे काम पूर्ण करावे, या मागणीसाठी अाडगाव व गडगाव येथील सुमारे २०० शेतकरी तहसील कार्यालयासमाेर उपाेेषणाला बसले हाेते. अामदार डाॅ. सतीश पाटील यांनी अाश्वासन दिल्याने त्यांनी उपाेषण मागे घेतले. 

 

आडगाव येथे सन १९८५ या वर्षात जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाने पाझर तलाव मंजूर केला अाहे. या पाझर तलावाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. याबाबत शासन दरबारी पाठपुरावा सुरुच हाेता. सन २०१५ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी अपूर्ण काम जलयुक्त शिवार योजनेत पूर्ण करण्याच्या सूचना सिंचन विभागाला दिल्या होत्या. त्यावर अद्यापही हालचाली नाहीत. 

 

या पाझर तलावाचे काम अपूर्ण असल्यामुळे आडगाव, तरवाडे, सावरखेडे व गडगाव या गावाचा पिण्याचा व सिंचनाच्या पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. सततच्या दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने पाझर तलावाचे काम सुरु करणे गरजेचे आहे. या मागणीसाठी उपसरपंच दीपक मोरे, डिगंबर शेलार, प्रवीण पाटील, छगन पाटील, लक्ष्मण पाटील, अनिल शेलार, संदिप पाटील, सचिन पाटील, शैलेंद्र मोरे, सुभाष पाटील यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपोषणास बसले होते. 

बातम्या आणखी आहेत...