आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण अपघात : भरधाव ट्रकने दुचाकीला ठोकरले; एकाच कुटुंबातील तिघे जागीच ठार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड - लग्नासाठी माळी पिंपळगाव येथे मोटारसायकलवर जात असलेल्या ितघांना पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिल्याने तिघेही जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अंबड-वडीगोद्री रस्त्यावर झिरपी पाटीजवळील महादेव मंदिरासमोर घडली. ज्ञानेश्वर ऋषींदर एखंडे (उपसरपंच), सुरेश रावसाहेब एखंडे, नारायण दत्तू एखंडे (बदापूर, ता.अंबड) अशी मृतांची नावे आहेत.


अंबड तालुक्यातील बदापूर चे उपसरपंच ज्ञानेश्वर ऋषींदर एखंडे, सुरेश रावसाहेब एखंडे, नारायण दत्तू एखंडे असे दुचाकीवरुन गावातील मुलाच्या लग्नाला गेवराई तालुक्यातील माळी पिंपळगाव येथे जात असताना अंबड तालुक्यातील अंबड वडीगोद्री रस्त्यावर झिरपी पाटीजवळील महादेव मंदिरासमोर जात असताना पाठीमागून येणारा ट्रक (एमएच २२ एन ७८६) च्या चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगात व निष्काळजीपणाने चालवून त्यांच्या मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे मोटारसायकलस्वार हे ट्रकसोबत सुमारे एक हजार फुटापर्यंत फरपटत गेले. त्यामुळे ते तिघेही जागीच ठार झाले. अपघाताची माहिती अंबड पोलिसांना मिळताच पोलिस उपनिरीक्षक शैलेश शेजूळ, जमादार के.बी.दाभाडे आदींनी धाव घेऊन पंचनामा करुन वाहतूक सुरळीत केली. मृतांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. 

 

मृत व्यक्ती चुलतभाऊ
मृत व्यक्ती हे एकाच कुटुंबातील असून एकमेकांचे चुलत भाऊ आहेत. मृत नारायण दत्तू एखंडे यांच्या मुलीचा सात दिवसांपूर्वी थाटामाटात विवाह सोहळा पार पडला होता. एकाच घरातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.