आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Strong Announcement Aginst Modi By Protesters, Miss Behave In Parliament Due To Maharashtra Condition

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विरोधकांकडून 'मोदी हाय- हाय'च्या जोरदार घोषणा, महाराष्ट्रावरून संसदेत विरोधकांचा गोंधळ

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकारणाचे पडसाद आता संसदेत उमटू लागले आहेत. या मुद्यावरुन हिवाळी अधिवेशनात सोमवारी काँग्रेस आणि विरोधकांनी दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. यामुळे लोकसभा आणि राज्यसभेची कार्यवाही मंगळवारी दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या काळात विरोधकांनी 'घटनेची हत्या करू नका' आणि 'मोदी सरकार हाय हाय'च्या घोषणा दिल्या. राहुल गांधी यांनी सांगितले की, मी सभागृहात प्रश्न विचारायला आलो आहे. मात्र, महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली आहे. यामुळे याला काही अर्थ नाही. काँग्रेस खासदारांनी लोकसभेच्या वेलमध्ये येत घोषणाबाजी करत गोंधळ घातला. सभापती ओम बिर्ला यांनी त्यांना सभागृहाचे महत्व टिकवायचे आणि शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र त्यांनी ऐकले नाही. यावर मार्शल्सनी काही सदस्यांना सभागृहातून बाहेर काढण्यात आले. नाराज सभापतींनी काँग्रेसचे खासदार टी. एन. प्रथपन आणि हिबी अॅडेन यांना निलंबित केले.

महिला खासदारांसोबत धक्काबुक्कीचा आरोप

लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी आरोप केला की, मार्शल्सनी कारवाई करताना महिला खासदारांना धक्काबुक्की केली. लोकसभेत असे वर्तन होईल अशी अपेक्षा नव्हती. तर काँग्रेस खासदार हिबी अॅडेन यांनी सांगितले की, मार्शल्सनी आमच्याकडून फलक हिसकावण्याचा प्रयत्न केला. याला विरोध केला असता महिलांशी गैरवर्तन करण्यात आले. तामिळनाडूतील काँग्रेस खासदार जोथामणि यांनी सभापतींकडे धक्काबुक्कची तक्रार केली.