आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Strong Protest Against Ausha's Assistant Assistant, Guardian Minister Sambhaji Nilangkar's Brothers Landed On The Street

मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाला औशात जोरदार विरोध, पालकमंत्री संभाजी निलंगेकरांचे भाऊ पक्षाच्या विरोधात उतरले रस्त्यावर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू सहकारी अशी ओळख बनवलेल्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील निलंगेकरांना भाजपाच्या पहिल्या यादीत स्थान मिळाल्याबद्दल मंगळवारी त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला. पण, त्याच यादीत मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांना औशातून उमेदवारी दिल्याने ते सर्व नाराज झालेत.

लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला होता. पण, मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत जवळचे अभिमन्यू पवार यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी फडणवीसांनी तो मतदारसंघ भाजपकडे वळवला. त्यानंतर भाजपच्या पहिल्या यादीत अभिमन्यू पवार यांना औशातून उमेदवारी देण्यात आली. पण त्यांच्या या उमेदवारीला औशातील स्थानिकांनी आणि मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असलेले संभाजी पाटील निलंगेकर यांच्या भावानेच विरोध केला आहे.
संभाजी निलंगेकरांचे लहान भाऊ अरविंद पाटील निलंगेकर, जिल्हा परीषदेचे कृषी सभापती बजरंग जाधव, माजी नगराध्यक्ष किरण उटगे आणि शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने यांनी औशात रस्त्यावर उतरून पक्षाचा निर्णयाचा निषेध केला. अभिमन्यू पवार मूळ औसा तालुक्यातील नाहीत. त्यांच्याऐवजी भूमिपुत्राला औशात उमेदवारी द्यावी अशी मागणी करत काही काळ ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यामुळे आता अभिमन्यू पवार यांच्या उमेदावारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.