आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंबीर महिलांमुळेच आर्थिक स्थिती सुधारेल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किरण मजूमदार

जगातील १८ टक्के लोकसंख्या ही भारतात राहते त्यात निम्म्या महिला आहेत. या कारणांमुळेच २०२५ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेला ५ ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहाेचण्यासाठी महिलांची भूमिका ही महत्त्वाची असेल. यामध्ये उद्योग करणाऱ्या महिलांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या सर्व क्षमतांचा विचार करून त्यांचे सशक्तीकरण होण्याची गरज आहे. यामध्ये भारतातील इनाेव्हेशन, आर्थिक विकास हा नवीन नोकऱ्या निर्माण करण्यास कारणीभूत ठरेल. मॅझिक ग्लोबल इन्स्टिट्यूटनुसार महिलांना प्रोत्साहन दिले तर वर्तमान परिस्थिती पाहता २०२५ मध्ये भारत आपला जीडीपी ०.७ ट्रिलियन डॉलर किंवा त्यापेक्षा १६ टक्के वाढू शकतो.

स्टार्टअप इकोसिस्टिम याला महिला उद्योजिकांच्या ऊर्जेला लाभ घेत आहे. स्टार्टअप इंडिया द्वारे सर्टिफाइड ६३०० स्टार्टअप मध्ये २५०० च्या संस्थापक, भागिदार, संचालक या महिला आहेत. देशात ८० लाख महिला या उद्योजिका आहेत ज्या वेगवेगळ्य ाभागात काम करत आहेत आणि त्या सफलतापूर्वक त्यांच काम करत आहेत तसेच त्या ऑर्गेनिक खाद्य, बांधकाम आणि सेवा पुरविण्याच्या क्षेत्रात व्यवसाय करत आहेत.

या उद्योजिकांमध्ये जवळजवळ ६० टक्के व्यवसाय हा त्यांनी २०-३० च्या वयात सुरू केला आहे. महिलांनी आता चांगल्या प्रकारे समजून घेतलं आहे की त्या पुरूषांप्रमाणे व्यवसायात यशस्वी होऊ शकतात. मला असं वाटतं की महिलांमध्ये करूणा, संवेदनशीलता , मल्टी टास्किंग असे गुण उपजतच असतात. कौशल्य आणि अनुभवाच्या माध्यमातून महिला या यशस्वी होऊ शकतात. त्यांना गरज असते ती आत्मविश्वास आणि पाठिंब्याची आवश्यकता असते.


उदाहरण बघायचे तर जेव्हा मी बायोकॉन सुरू केला तेव्हा माझं वय, जेंडर पाहता मलाही व्यवसायातील अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. कोणतीही बॅंक मला कर्ज देत नव्हती, कोण कौशल्य असलेला व्यक्ती माझ्यासोबत काम करण्यास उत्सुक नव्हता. व्यवसाय सुरू करणे हे इतके आव्हानात्मक होते कारण महिलांचा व्यवसाय हा धोका समजला जातो. पण मी खूप कष्ट केले आणि माझ्या स्वप्नांना पूर्ण केले. आज बायोकॉन या गोष्टीचा पुरावा आहे आज भारतातील सर्वात महत्त्वाचा व्यवसाय म्हणून बायोकॉनकडे पाहिले जाते. आज माझ्या व्यवसायाने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. मी खूप पुढं गेली आहे.
आता सरकार आणि वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था या स्वत:हून मदत करण्यासाठी पुढं येत आहेत. राज्य सरकारने त्यांच्यासाठी आर्थिक योजना देखील राबविल्या आहेत. इनफॉर्मेशन टेक्नॉलॅजीमध्ये लिंगभाव आधारीत कोणतेही अडथळे नाहीत. इंटरनेट त्या

सर्वांना संधी देतो जे माहितीपर्यंत पोहू पाहत आहेत. जेव्हा ७० च्या शतकात मी सुरवात केली होती तेव्हा व्यवसायित संघर्षापेक्षा मला माहितीपर्यंत पोहचणे माझ्यासाठी मोठे आव्हान होते. मी इंटरनेट क्रांतीची खूप ऋणी आहे. ज्यामुळे महिला या आपल्या चांगल्या पद्धतीने व्यवसाय करू शकल्या. भारतात इंटरनेट मोठ्या प्रमाणात वापरले जाते. इंटरनेट एंड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया नुसार ४५.१ कोटी एक्टीव्ह इंटरनेट वापरकर्ते भारत हा चीननंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. या वापरकर्त्यांमध्ये १२-२९ वर्षाचे प्रमाण हे ९७ टक्के आहे. भारतात मोबाइल डेटा हा अतिशय स्वस्त आहे.

भारतात मोबाइल फोनचा वापर वाढल्यामुळे महिलांचे सशक्तीकरण होण्याच्या संधी निर्माण होत आहेत. एक अरब पेक्षा जास्त मोबाइल सबस्क्राइबरच्या माध्यमातून उद्योजिका महिला आपला व्यवसाय वाढवत आहेत. भारतासारख्या देशात महिला मोठ्या प्रमाणात असंगठित क्षेत्रात काम करतात. त्यांच्या वस्तू आणि सेवा देण्याच्या प्रमाणामुळे मोबाइल आणि तंत्रज्ञानाचे मार्केट तयार होण्यात मदत होऊ शकते. यामुळे त्यांचे आर्थिक उत्पन्नात वाढ होईलच पण यामुळे लैंगिक समानताही होऊ शकते.

नवनिर्मीती ही वेगवेगळ्या वस्तूमध्ये करणे गरजेचे नाही तर वस्तूंचे वर्गीकरण ही करणे गरजेचे आहे. कोणताही उद्योग हा यशस्वी होण्यासाठी तिच्या कुटुंबाची साथ असणे गरजेचे आहे. जेव्हा मी बायोकॉन सुरू केले तेव्हा मी एकटी होते. पण नंतर माझ्या यशात माझ्या पतीची भूमिका महत्वपुर्ण आहे. आज महिलांचा आत्मविश्वास दृढ होण्यासाठी तसेच कष्ट करण्यासाठी ही साथ गरजेची असते. मी एक स्त्री असण्याचा मला अभिमान आहे. मला वाटते जग त्यांचेच आहे जे नवीन निर्माण करतात. व्यावसायिक महिला लिंगभावासंबधित असणारे सर्व भेट मिटवून टाकते. मला नेहमी वाटते व्यवसाय करणारी महिला ही नेहमी सामाजिक परिवर्तन करू शकते. ती देशाच्या आर्थिक वाढीसाठी मदत करू शकते.

महिलांना सशक्त बनविणे ही एक स्वयमपुर्ण राष्ट्रनिर्मितीची अट आहे. जेव्हा महिला सशक्त होतीत तेव्हाच एक स्थिक समाज निर्मितीचे आश्वासन दिले जाऊ शकते. महिलांचे सशक्तीकरण आवश्यक आहे कारण महिलांची मूल्य ही एक सुदृढ समाज, कुटुंब आणि राष्ट्र निर्मिती करू शकतात- एपीजे अब्दूल कलाम.

किरण मजूमदार-शॉ, अध्यक्ष-एमडी, बायोकॉन