आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविद्यालयात प्रवेशाचे आमिष दाखवून विद्यार्थिनीवर अत्याचार; जिवे मारण्याचीही धमकी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गुरू-शिष्य परंपरेला काळिमा फासणारी घटना सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. महाविद्यालयात प्रवेश देतो, नोकरी लावून देतो, असे सांगत प्राध्यापकाने विद्यार्थिनीवर बलात्कार केला. ही बाब कोणाला सांगितली तर जिवे मारण्याची धमकीही दिली. पीडितेच्या फिर्यादीवरून या प्राध्यापकावर १ डिसेंबर रोजी सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यासह त्याला साथ देणाऱ्या दोन महिला व शरीर सुखाची मागणी करणाऱ्या घर मालकावर कलम ३७६, ३५४, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

संभाजी बाबूराव वाघमारे (रा. नंदनवन कॉलनी), घरमालक राहुल तुळसे (रा. सातारा परिसर) आणि दोन महिलांचा अारोपींमध्ये समावेश आहे. वाघमारे हा नेहरू महाविद्यालयात प्राध्यापक आहे. पीडितेच्या घरी जात त्याने फर्स्ट इयरचे अॅडमिशन देतो, त्यानंतर नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवले. बेडरूममध्ये जात बळजबरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. २० जून २०१७ रोजी हा प्रकार घडला. त्यानंतर तो सतत अत्याचार करत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही बाब इतर संशयित आरोपींना सांगितली असता त्यांनी पीडितेस शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. वाघमारे यानेच तुळसे याच्या घरात पीडितेला भाड्याने खोली करून दिली होती. त्या घरमालकानेही आपल्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक डोईफोडे करत आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...