Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Student commits suicide because of fail in SSC exam

दहावीत नापास झाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या; दुपारी निकाल पाहिल्यानंतर राहत्या घरी केले विष प्राशन

प्रतिनिधी, | Update - Jun 09, 2019, 08:45 AM IST

औॆढाा तालुक्यात एका विद्यार्थ्याने नापास झाल्यामुळे धावत्या टॅम्पोसमोर घेतली उडी

  • Student commits suicide because of fail in SSC exam

    सेलू - तालुक्यातील चिकलठाणा येथील एका विद्यार्थिनीने दहावीत नापास झाल्यामुळे घरी विष प्राशन करून शनिवारी दुपारी आत्महत्या केली. सुभाष विद्यालयाची इयत्ता विद्यार्थिनी सुरेखा बालासाहेब जाधव (१६) हिने दुपारी ऑनलाइन निकाल पाहिला. नापास झाल्यामुळे घरी जाऊन विष प्राशन केले. या घटनेची माहिती घरच्यांना कळताच सुरेखा जाधवला सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी मृत घोषित केले. सुरेखा जाधव हिच्यावर सायंकाळी साडेसात वाजता चिकलठाणा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.


    धावत्या टेम्पोसमोर विद्यार्थ्याची उडी : दहावीत नापास झाल्यामुळे खिन्न झालेल्या औंढा तालुक्यातील मेथा येथील अनिल बबन पोले (१५) याने धावत्या टेम्पोसमोर उडी घेतली. तो सुदैवाने बचावला. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहेत.

Trending