आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलग 45 तास पबजी गेम खेळणाऱ्या तरुणाचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - तेलंगणातील जगतीयाल शहरात २० वर्षीय विद्यार्थी सलग ४५ दिवस मोबाइल पबजी हा ऑनलाइन गेम खेळत होता. त्यातच त्याचा मृत्यू झाला. वृत्तानुसार, सातत्याने पबजी गेम खेळण्याने त्याच्या मानेत दुखणे सुरू झाले. 


यामुळे त्याला हैदराबादेतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. डॉक्टरांनी सांगितले, खूप काळ मोबाइलवर गेम खेळल्याने मानेभोवतालच्या नसांवर गंभीर परिणाम झाला होतो. तर कर्नाटकात एका विद्यार्थ्याने उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तरे लिहिण्याएेवजी पबजी गेम कसा खेळाल? याची सविस्तर माहिती लिहिली होती. त्याने संपूर्ण उत्तरपत्रिकेवर हेच लिहिले होते. विशेष बाब म्हणजे, महाराष्ट्रात पबजी गेम खेळत असताना दोघे जण रेल्वेखाली आले होते. पबजी गेमच्या विळख्यात अनेक तरुण अडकले गेले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...