आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतंग उडवताना नाशिक, राहत्यात 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पतंग उडवताना तोल जाऊन दहावीचा विद्यार्थी पडला. गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाला. मंगळवारी मकरसंक्रांतीनिमित्त शहरातील बालाजीनगर भागात राहणारा सुफियान निजाम कुरेशी (१६) जागृतीनगर भागात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पतंग उडवत होता. या वेळी तोल गेल्याने तो जमिनीवर पडला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सुफियानला रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना सुफियान याचा मृत्यू झाला. 

 

राहत्यात विजेच्या तारेला चिकटून मृत्यू 
पतंग उडवताना विजेच्या तारेला चिकटून तुषार चंपालाल वाडीले (१८) याचा मंगळवारी राहत्यात (जि. नगर) मृत्यू झाला. तो बारावीत शिकत होता. एका इमारतीवर तुषारसह आठ-दहा मुले पतंग उडवत होती. तुषारच्या कानाला हेडफोन होता. पतंग उडवतानाच फोनवर बोलत असताना इमारतीजवळून गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युत तारेला तो चिकटला. त्याचा मामा योगेश शिवदे त्याला वाचवण्यासाठी गेला असता तोही जखमी झाला. तुषारला शिर्डी येथील रुग्णालयात नेले, मात्र, डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 
 

बातम्या आणखी आहेत...