Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | student died In case of removing water from well

दुष्काळाचा बळी : पाणी काढताना विहिरीत तोल जाऊन विद्यार्थिनीचा मृत्यू

प्रतिनिधी, | Update - Jun 09, 2019, 09:28 AM IST

विहिरीत पडल्यानंतर डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला.

  • student died  In case of removing water from well

    भोकरदन - टँकरचे पाणी विहिरीत सोडल्यानंतर ते पाणी काढण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थिनीचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. ही घटना भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी येथे शनिवारी चार वाजेदरम्यान घडली. निकिता गजानन शिंदे (१५) असे विद्यार्थिनीचे नाव आहे.


    लिंगेवाडी येथे मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली असून या गावात टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. हे टँकर गावालगत असलेल्या विहिरीत सोडले जाते. त्यानंतरच विहिरींमधून गावातील नागरिक व महिला पाणी काढतात. दरम्यान टँकर आल्यानंतर या वेळेस मात्र पाणी काढण्यासाठी मोठी झुंबड दिसून येते. अशीच परिस्थिती आज पाण्याचे टँकर आल्यानंतर पाणी काढण्यासाठी गावातील महिला व नागरिकांची त्या सार्वजनिक विहिरीवर पाणी काढण्यासाठी मोठी गर्दी जमली असताना निकिता देखील याच वेळी पाणी काढत होती. मात्र, पाणी काढत असताना अचानक तिचा काठावरील पाय घसरला व तिचा तोल गेला आणि ती विहिरीत पडल्यानंतर तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

Trending