आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 कुत्र्यांच्या हल्ल्यात शासकीय आश्रम शाळेच्या विद्यार्थ्‍याचा मृत्यू, नवापूरमधील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर (नंदुरबार)- तालुक्‍यातील घनराट येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत पाचवीत शिकणा-या विद्यार्थ्‍यावर 4 कुत्र्यांनी हल्‍ला केल्‍याने त्‍याचा मृत्‍यू झाला आहे. अनिकेत नाईक असे विद्यार्थ्‍याचे नाव आहे. तो भांगरपाडा येथील रहिवासी आहे.  रविवारी संध्‍याकाळी अनिकेतवर कुत्र्यांनी हल्‍ला केला होता.

 

रविवारी संध्‍याकाळी आश्रम शाळेमागील उष्‍टे अन्‍न खाण्‍यासाठी मोठ्या प्रमाणात कुत्रे जमा झाले होते. यादरम्‍यान येथे शौचालयासाठी गेलेल्‍या अनिकेतवर चार ते पाच कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. हल्‍ल्‍यानंतर शासकीय माध्यमिक आश्रम शाळेतील मुख्याध्यापक व अधीक्षकांनी विद्यार्थ्याला तात्काळ नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्‍याला नंदुरबार जिल्हा रूग्णालयात हलवण्‍यात आले होते. हल्‍ल्‍यामध्‍ये विद्यार्थ्‍याच्‍या हाताच्या रक्तवाहिन्या फाटल्या होत्‍या. त्‍यावर रविवारी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र सोमवारी संध्याकाळी उपचारादरम्‍यान विद्यार्थ्‍याची प्राणज्‍योत मालवली. नवापूर तालुक्यात वाढते कुत्र्यांचे प्रमाण जीवघेणे ठरत असल्याने प्रशासनाने योग्य खबरदारी घ्यावी, अशी मागणी आता पालक वर्गाकडून होत आहे.

 

शाळेत शौचालय असतानाही विद्यार्थी बाहेर का गेला?
प्रतिनिधीने दिलेल्‍या माहितीनूसार, शाळेत शौचालयाची सुविधा आहे. तरीही विद्यार्थ्‍याने या शौचालयाचा वापर का केला नाही?  तो संध्‍याकाळी शौचास बाहेर का गेला? असे प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...