आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू, पारध पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आन्वा-मित्रांसोबत अन्वा पाडा येथील पाझर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चौदावर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चार वाजेदरम्यान घडली. वेळीच हा प्रकार लक्षात न अाल्याने दुसऱ्या दिवशी शनिवारी ११ वाजता ग्रामस्थांच्या शोधमोहिमेनंतर मृतदेह  गाळात फसलेला आढळून आला. अयानखाँ इम्तियाज (१४) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. 

 

भोकरदन तालुक्यातील अन्वा येथील अरबिया रियाजुल उलूम अरबी मदरशात अयान शिक्षण घेत होता. तो मूळचा पुण्याच्या भवानी पेठ येथील रहिवासी अाहे. शुक्रवारी शाळेला सुटी असल्याने तो चार मित्रांसोबत दुपारी जवळील न्वा पाडा येथील पाझर तलावात पोहण्यासाठी गेला होता. तलावात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडाला. या वेळी सोबतच्या मुलांनी तेथून पळ काढला. या प्रकाराबाबत शाळेत उशिराने माहिती मिळाल्यानंतर परिसरात त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. रात्रीची वेळ झाल्याने  शुक्रवारी सायंकाळपर्यंत त्याचा शोध घेतला. परंतु तलावात वीस फूट पाणी असल्यामुळे सापडला नाही. शनिवारी सकाळी स्थानिकांच्या मदतीने शोध घेतल्यानंतर शनिवारी सकाळी ११ वाजता अयानचा मृतदेह गाळात फसलेला आढळून आला. तलावात गाळ असल्यामुळे त्यात तो फसल्याने त्याचा मृत्यू झाला. पारध पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पी. एन. सिनकर करत आहेत.