Home | Khabrein Jara Hat Ke | Student Filmed Raining Spiders in Brazil

आकाशातून पडत होता Spiders (कोळी कीटक) चा पाऊस, कॉलेज विद्यार्थ्याने बनवला व्हिडिओ

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 15, 2019, 12:02 AM IST

विचित्र घटनेला पाहून लोकांनी लावले तर्क-वितर्क, एक्सपर्टने सांगतिले यामागचे खरे कारण


  • मिनस गेरिस : ब्राझीलच्या मिनस गॅरिस भागात आभाळातून कोळ्यांचा पाऊस पडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. येथे राहणाऱ्या एक विद्यार्थ्याने या विचित्र घटनेचा व्हिडिओ तयार केला आहे. हे सर्व घडताना पाहून तो खूप भयभीत झाला होता. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आकाशातून शेकडो कोळी जमिनीच्या दिशेने लटकत आहेत. या ठिकाणी आकाशातून कोळी खाली पडत असल्याचे वाटत आहे.


    - व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर याबाबत खूप वादविवाद सुरु झाला. काही लोक हे दृश्य पाहून हैराण झाले होते. तर काहींना हा व्हिडिओ खोटा असल्याचे सांगितले. पण एक्सपर्ट्सच्या मते खरंच अशाप्रकारची घटना घडली होती.


    एक्सपर्ट्सने सांगितले यामागचे कारण

    - एक्सपर्ट्सच्या मते अशाप्रकारे शेकडो कोळींचे आकाशात लटकने एक विचित्र घटना आहे. खरंतर हे कोळी गरम आणि आर्द्र वातावरणात अशाप्रकारची हालचाल करत असतात. हे कोळी सामूहिक रूपाने जवळील झाडे आणि टेकड्यांचा आधार घेऊऩ एक मोठे दाट जाळे विणते.
    - हे इतके दाट जाळे असते की, यामध्ये मोठी शिकार सहज अडकते. हवेच्या दबावामध्ये परिवर्तन होते. तेव्हा हे जाळे बऱ्यापैकी वर उचलल्या जाते. यामुळे आकाशातून कोळींचा पाऊस पडत असल्याचा भास होतो.

Trending