आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यरात्री टॉयलेटमध्ये मुलीला जन्म देऊन पळून गेलेली आई निघाली विद्यार्थिनी, CCTV मुळे खुलासा, पोलिसांनी असे शोधले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिसार - युनिव्हर्सिटीच्या एखा विद्यार्थिनीने सिव्हील हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये मुलीला जन्म दिला. त्यानंतर ती मुलीला सोडून निघून गेली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीनंतरची आहे. योगायोगाने एका रुग्ण महिलेने चिमुरड्या मुलीला पाहिले त्यानंतर त्या चिमुरडीला हॉस्पिटलच्या NICCU वार्डात दाखल करण्यात आले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि विद्यार्थिनीबरोबर आलेल्या तरुणाच्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे रात्रभर पोलिसांनी शोध घेत सकाळी 6 वाजता विद्यार्थिनीचा शोध लावला आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. 


हॉस्पिटलच्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यानुसार शुक्रवारी रात्री 11:45 वाजता एक टाटा मॅजिक गेटवर येऊन थांबली. त्यातून दोन महिला आणि एक पुरुष इमर्जन्सीमध्ये गेले. तरुणीने सांगितले की तिचे पोट दुखत आहे. तेव्हा स्टाफने नाव वगैरे नोंदवण्यास सुरुवात केली. तेव्हाच बरोबर 12 वाजता तरुणी तेथून निघून गॅलरीजवळच्या टॉयलेटमध्ये गेली. 


12:10 वाजता ही महिला टॉयलेटमधून बाहेर निघाली. 12:20 वाजता एक महिला टॉयलेटमध्ये गेली तर तिला बाळ रडण्याचा आवाज आला. आत पाहिले तर तिला एक नवजात बाळ आढळले. त्याठिकाणी असलेल्या स्टाफला याबाबत माहिती दिल्यानंतर बाळाला NICCU वॉर्डात अॅडमिट करण्यात आले. 


पोलिसही माहिती मिळताच पोहोचले. त्यांनी तरुणीबरोबर आलेल्या तरुणाच्या मोबाईल नंबरवर संपर्क केला. सकाळी जवळपास 6 वाजता तरुणी ाली. त्यानंतर तिलाही अॅडमिट करण्यात आले. सध्या दोघे सुखरुप असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 


पोलिसांनी सांगितले की, रात्री तरुणीच्या पोटात दुखले त्यामुळे ती कोणालाही न सांगता औषध घेण्यासाठी आली. लिफ्ट घेऊन ती हॉस्पिटलमध्ये आली. पण टॉयलेटमध्ये तिची प्रसुती झाली. ती घाबरून गेली होती त्यामुळे नातेवाईकांना बोलवायला गेली. आता तिने बाळ स्विकारले आहे, असेही पोलिस म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...