आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या राज्यातील विद्यार्थ्यांना मोफत वाटण्यात येतील 15 लाख लॅपटॉप; \'Lenovo\' कंपनीला मिळाले कॉन्ट्रॅक्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क- काही दिवसांपूर्वी तामिळनाडू सरकारने पर्सनल कंप्युटर तयार करणाऱ्या 'Lenovo' कंपनीला 15 लाख लॅपटॉपची निर्मिती करण्याची ऑर्डर दिली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांनी काही दिवसांपूर्वी मोफत लॅपटॉप वाटण्याची घोषणा केली होती. त्यानुसार तामिळनाडू सरकार राज्यातील सर्व शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देणार आहे. 

 

याआधीही लाखो विद्यार्थ्यांना मिळाले होते मोफत लॅपटॉप 
2015-16 मध्ये तामिळनाडू सरकारने जवळपास 5.19 लाख लॅपटॉप वाटले होते. तर हीच संख्या 2016-17 मध्ये 5.58 लाख इतकी होती. सुत्रांनुसार अजुनपर्यंत 'Lenovo' कंपनीकडून याबाबत अधिकृतरित्या दुजोरा मिळालेला नाही. अनेक वर्षांपासून तामिळनाडू सरकारकडून लोकांना मोफत वस्तू वाटण्याची परंपरा सुरू आहे. याआधीही सरकारकडून तामिळनाडूतील लोकांना मगंळसूत्र, कलर टिव्हीसारख्या भेटवस्तू वाटण्यात आल्या होत्या. 

 

तामिळनाडूप्रमाणेच उत्तर प्रदेशा सरकारनेही विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप वाटण्याची योजना सुरू केली होती. त्या योजनेअंतर्गत राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप वाटण्यात आले होते.

 

 

बातम्या आणखी आहेत...