आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Student Who Has Nothing To Give Surprises Teacher With Christmas Gift She Shall Never Forget

क्रिसमसच्या सुट्यांवर जाण्यापुर्वी मुलं स्कूल टीचरला देत होते गिफ्ट्स, पण एका मुलीकडे देण्यासाठी काहीच नव्हते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंगटन. अमेरिकेच्या एका शाळेत क्रिसमसच्या सुट्या लागण्यापुर्वी एका महिला टीचरला तिच्या क्लासमधील सर्व मुलं गिफ्ट्स देत होते. पण टीचरला एका लहान मुलीने दिलेले गिफ्ट खुप आवडले. विशेष म्हणजे, त्या मुलीने महागडे गिफ्ट दिले नाही. पण तरीही हे गिफ्ट टीचरला खुप आवडले. याविषयी तिने फेसबुक अकाउंटवर शेअर केले. ती म्हणाली की, तुमच्याजवळ जे आहे आणि जे दुसरे तुम्हाला देतात, त्यासाठी आभारी राहा. कारण हे खुप मनापासून दिलेले असते. 

 

फ्री-ब्रेकफास्टमधून काढले गिफ्ट 
- ही स्टोरी वॉशिंगटनच्या एमिस्टेड एलिमेंट्री स्कूलमध्ये शिकवणारी लेडी टीचर रशेल प्रेटची आहे. शाळेला नुकत्याच 2 आठवड्यांसाठी सुट्या लागल्या. यापुर्वी स्कूल टीचर्सने मुलांना आपापल्या पध्दतीने क्रिसमस ट्रीट दिली. कुणी त्यांच्यासाठी बुक्स घेऊन आले तर कुणी त्यांना पार्टी दिली. या बदल्यात मुलांनीही आपल्या फेव्हरेट टीचर्सला गिफ्ट्स दिले. यादरम्यान रशेललाही अनेक गिफ्ट्स मिळाले. 
- मुलांनी रशेलला जे गिफ्ट्स दिले त्यामध्ये चॉकलेट्स, स्वीट्स, हातांनी बनवलेले नोट्स आणि काही ज्वेलरीचा समावेश होता. पण या सर्वांमध्ये रशेलला मार्शमैलो (साखरेच्या गोड-गोड गोळ्या)या गिफ्टने इम्प्रेस केले. या एका लहान मुलीने तिला दिल्या होत्या. 
- रशेलने या गिफ्टविषयी फेसबुक अकाउंटवर शेअर करत लिहिले की, आमच्या शाळेत शिकणा-या 100% मुलांना फ्री लंच मिळते. यासोबतच शाळेत त्यांना रोज फ्री ब्रेकफास्टही दिले जाते.

 

ज्या मुलीकडे काहीच नव्हते, तिनेच दिले सर्वात चांगले गिफ्ट 
- रशेलने लिहिले, शाळेतील एका मुलीला खुप मनापासून काही तरी गिफ्ट द्यायचे होते. पण तिच्याकडे द्यायला काहीच नव्हते. तरीही तिने मला काही तरी दिलेच आणि गिफ्ट शोधले. तिने शाळेत मिळणा-या फ्री ब्रेकफास्टमधून मार्शमॅलोच्या गोळ्या काढून वेगळ्या केल्या आणि मला त्याच एका लहान पॉली बॅगमध्ये रॅप करुन दिल्या. या गोळ्या मुलांना ब्रेकफास्टमध्ये मिळतात. 
- टीचरने पोस्टच्या शेवटी लिहिले की, तुमच्याजवळ जे आहे आणि जे तुम्ही दूस-यांना देता त्यासाठी आभारी राहा. हे सर्व कुणाच्या तरी मनापासून येते. हॅप्पी हॉलिडेस.
- सोशल मीडियावरील रशेलची ही पोस्ट खुप व्हायरल होत आहे. या पोस्टला 3.5 लाख पेक्षा जास्त लोकांनी लाइक केले आहे. तर सव्वा लाखांपेक्षा जास्त शेअर मिळाले आहे. लोक यावर कमेंट्स करत आहेत.

 

 

बातम्या आणखी आहेत...