तरुणीला नखे कुरतडण्याची होती सवय, आधी झाली जखम, मग जीव वाचवण्यासाठी कापावा लागला पूर्ण अंगठा
ऑस्ट्रेलियातील रहिवासी एका कॉलेज तरुणीला नखे कुरतडण्याची सवय महागात पडली.
-
(ही कहाणी 'सोशल व्हायरल सिरीज'अंतर्गत आहे. जगभरात सोशल मीडियावर अशा स्टोरीज व्हायरल झाल्या आहेत, ज्या तुम्हाला माहिती असाव्यात)
ब्रिस्बेन - ऑस्ट्रेलियातील रहिवासी एका कॉलेज तरुणीला नखे कुरतडण्याची सवय महागात पडली. या सवयीमुळे तिच्या अंगठ्याला भयंकर जखम झाली, जी पुढे जाऊन रेअर कॅन्सरमध्ये बदलली. यानंतर डॉक्टरांनी तिचा अंगठा कापून जीव वाचवला.
4 वर्षे लपवले कुटुंबापासून हे सत्य
- ही स्टोरी ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेनमधील रहिवासी 20 वर्षीय कर्टनी व्हिथॉर्नची आहे. ती सायकोलॉजी स्टूडेंट असून पार्टटाइम रिसेप्शनिस्टचे कामही करते.
- व्हिथॉर्नला नखे कुरतडण्याची लहानपणापासून सवय होती. तिला ही सवय शाळेत असताना जडली होती. इतर मुले जेव्हा तिला त्रास द्यायची तेव्हा तणावात येऊन ती नखे कुरतडायची.
- आपल्या या सवयीमुळे व्हिथॉर्नने 4 वर्षांपूर्वी 2014 मध्ये आपल्या अंगठ्याची पूर्ण नखे चावली. यानंतर तिचा अंगठा काळा पडू लागला. कर्टनी यामुळे खूप भेदरली होती. यामुळे लाजेपोटी तिने ही बाब आपल्या मित्रांपासून तसेच घरच्यांपासून लपवून ठेवली.
- या वर्षी जुलैमध्ये कर्टनीच्या उजव्या हाताच्या अंगठ्यामधील जखम सडायला लागली. यानंतर ती डॉक्टरांकडे गेली. तपासणीनंतर कळले की, तिच्या अंगठ्यामधील जखमेत एक रेअर कॅन्सर झाला आहे. कर्टनीला एक्राल लैंटिगिनस सबंगुअल मेलेनोमा नावाचा कॅन्सर झाला होता.
- यानंतर डॉक्टरांनी अनेक सर्जरी करत तिचा कॅन्सर हटवण्यासाठी आणि अंगठ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीच फायदा झाला नाही. यानंतर तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी मागच्या आठवड्यात तिचा अंगठा कापण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर म्हणाले की, जर अजून उशीर झाला असता, तर कॅन्सर शरीरातील इतर भागातही पसरला असता.
भयंकर असतो त्वचेचा कॅन्सर
- अंगठा काळा पडू लागल्यावर व्हिथॉर्न डॉक्टरांना जाऊन भेटली. तेथून तिला प्लास्टिक सर्जनकडे पाठवण्यात आले. डॉक्टरांनी आधी तर फक्त नखे काढून काम चालवून पाहिले. परंतु नंतर डॉक्टरांनी तिला बायोप्सी करण्यासाठी सांगितले.
- बायोप्सी झाल्यावर अनेक तपासण्यांनंतर कळले की, तिच्या अंगठ्याला रेअर पद्धतीचा कॅन्सर झाला आहे. यानंतर अनेक सर्जरी करून तिच्या अंगठ्यातून कॅन्सर प्रभावित सेल्स काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु तोपर्यंत कॅन्सर पूर्ण अंगठ्यात पसरलेला होता.- कर्टनीला 'एक्राल लैंटिगिनस सबंगुअल मेलेनोमा' नावाचा त्वचेचा दुर्लभ कॅन्सर झाला होता. जो एखाद्या व्यक्तीच्या हातावर वा त्याच्या पायाच्या तळव्यावर वा त्याच्या नखांच्या खाली आढळतो.
- साधारणपणे ही खराब त्वचेवर एका सपाट डागापासून सुरू होतो. जो एका डागासारखा दिसतो, पण हळूहळू वाढत जातो. हा कॅन्सर सामान्यपणे तिळाच्या माध्यमातून पसरतो आणि हा गोऱ्या व्यक्तींमध्ये होण्याचे प्रमाण एक टक्क्यांहून कमी असते.
कर्टनीला बसला नाही विश्वास
- याबाबत व्हिथॉर्न म्हणाली, 'जेव्हा मला कळले की, माझ्या नखे कुरतडण्याच्या सवयीमुळे मला कॅन्सर झाला आहे, तेव्हा मी खूप तणावात आले.'
- 'मी असे का वागले, याचा आता पश्चात्ताप होतोय. परंतु मला माहिती होते की, मी हे जाणूनबुजून केलेले नाही. मला विश्वासच बसत नव्हता. दुसरीकडे जगभरात असे अनेक जण आहेत ज्यांना नखे कुरतडण्याची सवय आहे, जी कॅन्सरशी गाठ घालणारी आहे.'पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित Video व Photos...
-
-
-