Home | Khabrein Jara Hat Ke | Student lost 63 kilos in 12 Month by simple tricks

लठ्ठपणामुळे या मुलीने गमवला होता आत्मविश्वास..'हे' उपाय करुन 12 महिन्यांत घटवले 63 किलो वजन

दिव्यमराठी वेब टीम | Update - Nov 06, 2018, 04:01 PM IST

मुलीने सांगितले फक्त 'या' तीन गोष्टी सोडून कसे कमी केले वजन.

 • क्वींसलंड (ऑस्ट्रोलिया)- क्वींसलंडमध्ये एका 16 वर्षीय तरुणीने बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचा स्वत:चा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. अत‍िलठ्‍ठपणामुळे तिला स्कूलमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. शाळेत तिला एकही मित्र नव्हता, चारचौघात जाणे टाळत होती. मा‍त्र, ती डगमगली नाही. तिने यावर उपाय शोधून काढला.

  प्रचंड मेहनत घेण्याची तयारी तिने दर्शवली. तिने वजन कमी करण्याचा निर्धार केला. तिने अवघ्या 12 महिन्यांत 63 किलो वजन कमी केले. तिने यासाठी कार्बोहायड्रेट, शुगर, आणि प्रॉसेस्ड फूड खाणे बंद केले.

  लठ्ठपणामुळे स्वत:मध्ये न‍िर्माण झाली होती कमीपणाची भावना...

  > जोसे डेसग्रँड असे या मुलीचे नाव आहे. लठ्ठपणामुळे तिची थट्टा उडविण्यात येत होती. शाळेत मुले-मुली तिच्यावर कमेंट्स पास करत.
  > मात्र, जोसे अजिबात प्रतिक्रिया देत नव्हती. शांत डोक्याने विचार करून तिने वजन कमी करण्याचा निर्धार केला.
  > जोसेने तिच्या या प्रवासात सांगितले, हे सर्व करण्याअगोदर मी कार्बोहायड्रेट, साखर आणि प्रॉसेस्ड फूड खाणे टाळले. तिने 6 महिने फक्त नॅचरल शुगरच सेवन केली.
  > तिने सांगितले की, सुरुवातीच्या 15 दिवस तिच्यासाठी हेल्दी फूड खाणे सोपे नव्हते, परंतु आता हे सगळे खुपच मजेशिर झाले आहे. आता मी याकडे डायट म्हणून नाही तर लाइफस्टाइलच्या नजरेने पाहते.

  127 पैकी 63 किलो वजन केले कमी

  > बॉडी ट्रान्सफॉर्मेशनच्या सुरुवातीला तिने कमीत कमी व्यायाम केला आणि आता तिने पर्सनल ट्रेनर ठेवला आहे.

  > आठवड्यात जिममध्ये तीन ते चार सेशन तिच्या फिटनेस रूटीनचा भाग आहे. तर कमीत कमी कार्बोहायड्रेट आणि विनाशुगरचे पदार्थ खाऊन शरीरला व्यवस्थित डायट देत आहे.
  > जोसेच्या मेहनतीमुळे तिला बदल दिसायला लागले. 12 महिन्यांत तिने 127 किलो वजनपैकी 63 किलो वजन कमी केले. आता जवळपास दोन वर्षांनतर तिचे वजन फक्त 60 किलो झाले आहे.

  परत मिळवला आत्मविश्वास

  > जोसेने सांगितले, 'लठ्ठपणामुळे माझा आत्मविश्वास खुपच कमी झाला होता. माझा एकही मित्र नव्हता, मी लोकांमध्ये जाणेही टाळत होती. परंतु मी कधी खचले नाही. स्वत:वर मेहनत घेऊन गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवला.
  > तिने सांगितले, 'या दोन वर्षांमध्ये मी माझ्या आयुष्यात खुपच अडचणींचा सामना केला आहे. अडचणींचा सामना करत मी पुढे जात राहीले आणि विजय मिळवला.'
  > जोसेने सांगितले, 'प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट दिवस येतात, परंतु न घाबरता त्यांचा सामना करावा. सगळ्यांचे चांगले दिवस येतात.'

 • Student lost 63 kilos in 12 Month by simple tricks
 • Student lost 63 kilos in 12 Month by simple tricks
 • Student lost 63 kilos in 12 Month by simple tricks
 • Student lost 63 kilos in 12 Month by simple tricks
 • Student lost 63 kilos in 12 Month by simple tricks

Trending