आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मर्डर : हेअर ड्रेसरवर जडला एअर होस्टेसचा जीव, नंतर रडत आई वडिलांना म्हणाली, माझ्या प्रेमानेच माझे वाटोळे केले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पटियाला - तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एयर होस्टेसचा कोर्स करणाऱ्या तरुणीचा मृतदेह सापडला आहे. तरुणीच्या नातेवाईकांनी तिच्या पतीवर हत्येचा आरोप केला आहे. मुलीच्या हट्टामुळे तिचे लग्न हेअर ड्रेसरबरोबर लावून दिले होते, पण नंतर सासरचे तिला त्रास देऊ लागले, असे तरुणीच्या कुटुंबीयांनी सांगितले. मुलीचा पती तिला बेल्टने मारहाण करत होता, असेही कुटुंबीयांनी म्हटले आहे. एक दिवस मुलीने आईला शरिरावरील मारहाणीच्या खुणा दाखवल्या तेव्हा त्यांना धक्काच बसला होता. या छळामुळे तीन दिवसांपूर्वी ती अचानक घरातून निघून गेली होती. 


मुलीच्या हट्टामुळे दिले होते लग्न लावून 
- आई वडिलांनी सांगितले की, मुलीच्या हट्टामुळे तिला बीएससी नर्सिंग नंतर एअर होस्टेसचा कोर्स करू दिला. या दरम्यान तिची ओळख हेअर ड्रेसरचे काम करणाऱ्या सलीम खान नावाच्या तरुणाबरोबर झाली. 
- दोघांमध्ये मैत्री झाली. हळू हळू त्याचे प्रेमात रुपांतर झाले. आमचा त्याला विरोध होता. तरीही मुलीच्या हट्टामुळे आण्ही तिचे लग्न सलीमशी लावून दिले.
- मुलीचे लग्न झाल्यानंतर ती काही दिवसांनी रडत घरी आली, तिला विचारले तेव्हा तिने पतीने बेल्टने मारल्याच्या खुणा दाखवल्या. 


आईला म्हणाली होती, प्रेमामुळेच वाटोळे झाले 
- तरुणीच्या नातेवाईकांनी सलीमला विचारले तेव्हा त्याने पंचायचीसमोर राजीनामा केला आणि त्यांना घरी पाठवले. पण त्यानंतरही तशीच परिस्थिती कायम राहिली. सलीमने तिला पुन्हा मारहाण सुरू केली. नंतर तिला घरातूनही हाकलून दिले. त्यानंतर पोलिसांत सलीमविरोधात तक्रार केली होती. 
- तरुणी तिच्या आईला म्हणाली होती की, प्रेमामुळेच तिचे वाटोळे झाले. 


3 दिवसांपूर्वी घरातून गेली 
मुलगी तीन दिवसांपूर्वी घरातून गेली होती, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तिचा मृतदेह खनौरीमध्ये आढळला आहे. तिच्या ईचे म्हणणे आहे की, तिच्या मुलीची हत्या पती सलीमनेच केली आहे. तक्रारी वरून पोलिसांनी सलीम आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...