आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्या वर्गातील चिमुरडीवर शाळेच्या आवारात बलात्कार, इलेक्ट्रीशियनने केले दुष्कृत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - येथील सरकारी शाळेमध्ये दुसऱ्या वर्गातील चिमुरडीवर बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. इलेक्ट्रीशनने या चिमुरडीवर बलात्कार केला असून पोलिसांनी या इलेक्ट्रीशनला अटक केली असल्याचे सांगितले. या मुलीची मोठी बहीणही त्याच शाळेत शिकते. 


या इलेक्ट्रीशनने गुरुवारी या चिमुरडीला एकटीला गाठून शाळेतील पंप हाऊसमध्ये ओढत नेले. त्याचठिकाणी या इलेक्ट्रीशनने चिमुरडीवर बलात्कार केल्याची माहिती मिळाली आहे. या मुलीला रांगेतून जात असताना या इलेक्ट्रीशनने पकडल्याची माहिती मिळाली आहे. या चिमुरडीचे कुटुंब हे जवळच्या झोपडपट्टीमध्ये राहते.  

 

मुलगी दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी निघाली असताना इलेक्ट्रीशनने तिच्याबरोबर हे दुष्कृत्य केले. त्यानंतर ती घरी आली तेव्हा रडत होती. त्यावेळी रक्तस्त्राव पाहून तिची आई घाबरली त्यांनी तिला दवाखान्यात नेले तेव्हा डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिच्याबर बलात्कार झाल्याचे सांगितले. मुलीने दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी तक्रार नोंदवली आणि आरोपीला अटक केली. 

 

बातम्या आणखी आहेत...