आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एकेकाळी 'अंकुश', 'नरसिम्हा' आणि 'तेजाब'सारखे सुपरहिट चित्रपट बनवणारे दिग्दर्शक एन. चंद्रा आता पुनरागमन करत आहेत. ते 21 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित अभिनीत हिट चित्रपट 'तेजाब'चा सिक्वेल घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे नाव 'तेजाब 2' आहे. हा चित्रपट दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी राजकारणावर आधारित आहे. हा चित्रपट 10 मे रोजी रिलीज करण्याची तयारी आहे. या दिवशी टायगर श्रॉफचा चित्रपट 'स्टुडंट ऑफ द इयर 2'देखील रिलीज होणार आहे. या चित्रपटातून चंद्रा आपला मुलगा नचिकेत नार्वेकरलादेखील लाँच करत आहेत.
याशिवाय चित्रपटात तरुण गहलोत आणि प्रियंका खांडपालसारखे नवीन कलाकारदेखील आहेत. तरुण नुकताच रिलीज झालेल्या 'केदारनाथ' मध्ये सुशांतसोबत दिसला होता. तो दिबाकर बॅनर्जीच्या अपकमिंग 'संदीप और पिंकी फरार'मध्ये अर्जुनचा कोचदेखील आहे. याबरोबरच तो यात अभिनयदेखील करणार आहे.
'एक दो तीन...'चे रिक्रिएटेड व्हर्जन आणणार होते...
एफटीआयआयमधून पास झालेला तरुण सांगतो..., 'वर्षभरापूर्वीच हा चित्रपट तयार झाला आहे. आता आम्ही हा रिलीज करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वांनी ऍक्शन घेतली. चित्रपटासाठी काही प्रमोशनल गाणीदेखील शूट केली जाणार आहेत. खरं तर आम्ही या चित्रपटासाठी 'तेजाब'मधील हिट गाणे 'एक दो तीन...'ला रिक्रिएट करणार होतो. मात्र, त्याचे अधिकार टी-सिरीजकडे आहेत.
चित्रपटाविषयी काही खास गोष्टी :
- ऍक्शन धाटणीच्या या चित्रपटाच्या ऍक्शन रोहित शेट्टीच्या चित्रपटाचा अॅक्शन दिग्दर्शक प्रद्युम्न कुमार पीकेने डिझाइन केल्या आहेत.
- अनिल कपूरला यात मुख्य पात्राच्या वडिलांची भूमिका ऑफर झाली होती. अनिल यासाठी तयारही होता, मात्र तारखा जमल्या नाहीत.
- माधुरी दीक्षितलादेखील यासाठी अप्रोच केले होते. ती 'कलंक'मध्ये व्यग्र असल्यामुळे तिच्याही तारखा मिळाल्या नाहीत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.