आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेजच्या मॅडम त्रास देतात म्हणून मुलाने घेतला असा बदला, त्यांचा मोबाईल नंबर थेट पॉर्न साईटवरच टाकला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- गुजरात राज्यात गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. वर्गात शिकविता आपल्याला टार्गेट करते म्हणून एका विद्यार्थ्याने प्राध्यापिकेचा मोबाईक क्रमांक पॉर्नसाइडवर टाकला. त्यानंतर संबंधित प्राध्यापिकेला अश्लील फोन येऊ लागल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला.

 

काय आहे प्रकरण?

अहमदाबाद शहरातील एका कॉलेजमध्ये ही घटना घडली आहे. वर्गात शिकविताना प्राध्यापिका एका 24 वर्षीय विद्यार्थ्यावर ओरडत होती. सारखी त्यालाच प्रश्न विचारत होती. याचा राग मनात ठेवून त्यान प्राध्यापिकेचा मोबाईल क्रमांक पॉर्न साईटवर अपलोड केला. त्यानंतर त्या प्राध्यापिएला अश्लील मेसेज आणि व्हिडिओ येऊ लागले. या विचित्र प्रकाराने त्रस्त झालेल्या प्राध्यापिकेने सायबर सेलमध्ये तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता विद्यार्थ्यानेच हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...