आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिफ्ट देण्यासाठी मुलीकडे नव्हते पैसे, नंतर दिले असे गिफ्ट की ते पाहून खुप आनंदी झाल्या टिचर...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंगटन- अमेरिकेच्या एका शाळेत ख्रिसमसच्या सुट्या लागण्यापूर्वी तिच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी टिचरला खुप गिफ्ट दिले. पण टिचरला एका छोट्या मुलीचे गिफ्ट सगळ्यांत जास्त आवडले. खास बाब म्हणजे मुलीने महाग गिफ्ट दिले नव्हते तरीदेखील ते गिफ्ट टिचरला सगळ्यात जास्त आवडले. या बाबतीत टिचरने फेसबूकवर एक पोस्ट टाकली आणि त्यात लिहीले की, तुम्ही तसे आहात तसेच राहा आणि कोणी तुम्हाला काही दिले तर ते आनंदाने स्वीकारा कारण ते त्यांनी खुप प्रेमाने दिलेले असते.


फ्री-ब्रेकफास्टमधून निघाले गिफ्ट

- ही स्टोरी वॉशिंगटनच्या एमिस्टेड एलिमेंट्री शाळेत शिकणाऱ्या लेडी टीचर रशेल प्रेटची आहे. सध्या त्यांच्या शाळेला ख्रिसमसच्या सुट्या लागल्या आहेत त्यामुळे सगळ्या टिचर्सने विद्यार्थ्यांना गिफ्ट दिले. विद्यार्थ्यांनी सुद्धी आपल्या आवडीच्या टिचर्सला गिफ्ट दिले, त्यात रशेलही गिफ्ट मिळाले. 


- मुलांनी रशेलला जे गिफ्ट दिले त्यात चॉकलेट्स, स्वीट्स, हाताने बनवलेल्या नोट्स आणि काही ज्वैलरी होती. पण या सगळ्यात रशेलला जे गिफ्ट सगळ्यात जास्ती आवडले ते होते मार्शमेलो, ते एका मुलीने दिले होते.
 

ज्या मुलीकडे काहीच नव्हते तिनेच दिले सगळ्यात चांगले गिफ्ट
- रशेलने फेसबूकवर लिहीले की, एका मुलीला मला खुप वेळेपासून काहीतरी द्यायचे होते पण तिच्याकडे काहीच नव्हते. त्यामुळे तिने शाळेत मिळणाऱ्या फ्री ब्रेकफास्टमधले मार्शमेलो काढले आणि त्याला पॅक करून दिले.


- रशेलला हे गिफ्ट खुप आवडले आणि तिने याबद्दल फेसबूकवर शेअर केले. या पोस्टला आत्तापर्यंत 3 लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केले आहे.

बातम्या आणखी आहेत...