आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेत जाण्यासाठी व्हायची अडचण, अखेर 80 विद्यार्थ्यांनीच शाळेला दांडी मारून दुरुस्त केला रस्ता 10 किमीचा रस्ता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अर्धवट कामामुळे रस्त्याची दुरावस्था
  • 10 किलोमीटर पायी जाण्यासाठी मुलांना लागायचे दोन तास
  • रस्त्यावरील दगड आणि खड्ड्यांमुळे एसटीने बंद केली सेवा

औरंगाबाद - जिल्ह्यातील डभडी गावाची 10 किलोमीटरचा खराब रस्ता 85 शालेय विद्यार्थांनी वाहने जाण्या लायक बनवला आहे. रस्त्याच्या अर्धवट कामावर ठिकठिकाणी दगड पसरले होते. यामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. रस्ता दुरुस्त करण्यासाठी मुलांनी 10 जानेवारी रोजी शाळेला सुटी मारली होती. यानंतर रस्त्यावरील पसरलेले दगडांना हटवण्यात आले आणि खड्डे देखील बुजवले. एका ग्रामस्थाने दावा केला की, प्रशासनाने मागील डिसेंबरमध्ये धमणगाव राजूर खंडवर रस्त्याचे काम अर्थवट सोडले होते. यामुळे बदनापूर डेपोतून एसटीने आपली बससेवा एक महिन्यापासून बंद केली आहे. बस नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी धामणगाव ते डभडी रोज 10 किलोमीटर पायी चालत जावे लागत होते. यासाठी दोन तास लागत होते. रस्ता लवकरात लवकर करण्याची मागणी 


2019 मध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत धनगांव-राजुर या 18 किलोमीटर रस्त्याच्या कामासाठई मंजुरी देण्यात आली होती. मात्र हे काम पूर्ण झाले नाही. तर सरपंच मोनिका साळवे यांनी रस्त्याचे काम लवकर करण्याची मागणी केली आहे.  

ग्रामस्थांनी केले विद्यार्थ्यांचे कौतुक 


रस्त्यावर ठिकठिकाणी दगड असल्याने दुचाकीसह अन्य वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. इतकेच नाही तर पायी चालणाऱ्या लोकांना देखील या मार्गावरून चालता येत नव्हते. स्थानिकांचे म्हणणे आहे की, मुलांच्या प्रयत्नामुळे हा रस्ता चालण्यायोग्य झाला आहे. परंतु सरकार किंवा प्रशासनाने रस्ता दुरुस्त आणि पक्का करण्यावर विचार करायला हवा.