आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: शाळेत मुलांना वाढला असा पदार्थ, पाहताच मेली मुलांची भूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(ही कहाणी 'सोशल व्हायरल सिरीज'अंतर्गत देत आहोत. जगभरात सोशल मीडियावर अशा घटना व्हायरल झाल्या आहेत, ज्यांची आपल्याला माहिती असली पाहिजे...)

 

डुबोइस - अमेरिकेच्या पेन्सिल्वेनिया स्टेटमधील एका शाळेत काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना लंचमध्ये असा पदार्थ वाढण्यात आला, जो पाहिल्यानंतर मुलांनी लंचला नकार दिला. तो पदार्थ पाहून त्यांची भूकच मेली. जी डिश त्यांना खाण्यासाठी देण्यात आली होती, ती दिसायलाच खूप ओंगळवाणी होती. तथापि, ही काही एखादी खराब वा सडलेली डिश नव्हती, तर तो एक चीज बर्गर होता, तो जास्त भाजल्यामुळे तसा दिसत होता. काही मुलांनी जेव्हा त्या डिशचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला, तेव्हा युजर्सनी शाळेवर टीकेचा भडिमार केला.

 

- ही घटना गतवर्षी 14 नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या डुबोइस शहरातील शाळेच्या कॅफिटेरियामध्ये समोर आली होती. तेथे मुलांना लंचमध्ये असा पदार्थ वाढण्यात आला जो दिसायला अत्यंत किळसवाणा होता.
- सोशल मीडियावर त्या डिशचा फोटो व्हायरल झज्ञल्यानंतर जेव्हा शाळेच्या मॅनेजमेंटशी बोलणे झाले, तेव्हा शाळेचे सुप्रीटेंडेंट डॉ. ल्यूक लैंसबेरी यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, तो एक बर्गर होता. परंतु या घटनेनंतर हा पदार्थ आता शाळेच्या मेन्यूतून हटवण्यात आला आहे.
- ल्यूक म्हणाले की, साधारणपणे 155 डिग्रीवर बर्गर कूक केला जातो. परंतु त्या दिवशी जास्त तापमानामुळे हा पदार्थ असा दिसत होता. 


- बर्गर दिसायला कसाही असो, परंतु डॉ. ल्यूक म्हणाले की, तरीही तो खाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित होता. त्या दिवशी तब्बल 300 विद्यार्थ्यांना तो वाढण्यात आला होता. तथापि, नंतर पालकांच्या तक्रारीमुळे तो मेन्यूतून हटवण्यात आला.


- शाळेने जरी तो बर्गर वाढणे बंद केले असले, तरी इकडे सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यामुळे त्या शाळेची खूप नाचक्की झाली आहे. कित्येकांनी शाळेवर टीका करून राग व्यक्त केला.  

 

 

बातम्या आणखी आहेत...