आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी बसमध्ये बसण्यासाठी जागा नसल्याने विद्यार्थ्यांनी घातला गाेंधळ; एकास मारहाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- नांद्रा येथून प्रवाशांनी पूर्ण भरलेल्या एसटी बसमध्ये बसण्यास जागा नसल्याने कानळद्याच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास गाेंधळ घातला. यात नांद्र्याच्या एका विद्यार्थ्याला व वाद साेडवण्यास गेलेल्या त्याच्या मित्रांना मारहाण करण्यात अाली. वादानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी तब्बल अडीच तास कानळदा बसथांब्यावर तीन एसटी बसेस अडविल्या. सकाळी १० वाजता वाद निवळल्यानंतर कानळद्याचे विद्यार्थी नंदगाव बसमध्ये बसून जळगावला आले. जळगाव बसस्थानकातही पुन्हा त्याच विद्यार्थ्यास मारहाण करण्यात अाली. याप्रकरणी जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात दाेन विद्यार्थ्यांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 

 

वाद वाढल्यानंतर बस अडविण्यास केली सुरुवात; सकाळी १० वाजता वाद मिटल्यानंतर बस झाली मार्गस्थ 
>१ वाद अधिक वाढल्याने कानळदा बसस्थानकावर मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी व ग्रामस्थ जमा झाले. या वेळी विद्यार्थ्यांनी नंदगाव ही बस अडवली. काही विद्यार्थी बसमध्ये चालकाच्या जागेवर जावून बसले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सकाळी ७.३० ते १० वाजेपर्यंत येणाऱ्या नंदगाव व कानळदा या तीन बस अडविल्या. त्यामुळे बसस्थानकात वाहतूक काेंडी झाली हाेती. 

>२ वाद शांत झाल्यानंतर सकाळी १० वाजेच्या सुमारास नांद्रा व कानळदा येथील विद्यार्थी नंदगाव बसमध्ये बसून एकत्र जळगावला आले. जळगाव बसस्थानकातही ज्ञानेश्वर याला कानळदा येथील विद्यार्थ्यांनी मारहाण करुन बघून घेण्याचीही धमकी दिली. या वेळी बसस्थानकातील कर्मचाऱ्यांनी त्यांना समजवून वाद करू नका, असे सांगितले. 

>३ ज्ञानेश्वर व त्याचे मित्र तक्रार देण्यासाठी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आले. ज्ञानेश्वर याच्यासोबत नांद्रा येथील विद्यार्थी आलेले होते. पोलिसांनी मारहाण करणारे विद्यार्थी, त्यांचे पालक व कानळद्याचे पोलिस पाटील यांना पोलिस ठाण्यात बोलविले होते. याप्रकरणी जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात विद्यार्थ्यांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 


यामुळे हाेतात वाद
एसटी महामंडळाने जळगाव-पळसोद ही बससेवा बंद केल्यामुळे नंदगाव बसमध्ये प्रवाशांची गर्दी होते. कानळद्यावरून जळगावला येण्यासाठी अनेक बस आहेत; मात्र, काही विद्यार्थी नंदगाव बसमध्येच बसतात. या बसमध्ये मुली येत असल्याने कानळद्याचे काही विद्यार्थी गर्दी करतात. त्यामुळे बसमध्ये नेहमी वाद होत आहेत. गेल्या आठवड्यातही बसमध्ये कानळद्याचे विद्यार्थी आरडाओरड करीत होते. त्यांना समजावूनही ते ऐकत नव्हते. त्यामुळे महिला वाहकाने बस थेट तालुका पोलिस ठाण्यात आणली होती. त्या विद्यार्थ्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे नांद्रा येथील विद्यार्थ्यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...