आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमपीएससीत पारदर्शकता आणून पीएसआय परीक्षा स्वतंत्र घ्या या मागणीसाठी औरंगाबादमध्ये विद्यार्थ्यांचा अर्धनग्न मोर्चा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शासनाने महाभरतीच्या पोकळ आश्वासनांच्या घोषणेसह सुरू केलेल्या महापोर्टलच्या निषेधार्थ स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पैठण गेट ते विभागीय आयुक्त कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढला. या मोर्चामुळे उपस्थितांचे लक्ष वेधून घेण्यात आले.  स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांचा महाराष्ट्र राज्य विद्यार्थी समितीतर्फे हा मोर्चा काढण्यात आला होता.

 

अर्धनग्न मोर्चेकऱ्यांनी विविध मागण्यांचे फलक हाती धरत शासनाचा निषेध नोंदवला. यावेळी शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजीही करण्यात आली. महापोर्टल ऑनलाईन परीक्षा पद्धती रद्द करून जिल्हा निवड समितीकडून ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात यावी, पीएसआय पूर्व, मुख्य परीक्षा संयुक्त परीक्षेमधुन वगळुन स्वतंत्र घेण्यात यावी, एमपीएससीच्या वेळापत्रकासोबतच जागांची आकडेवारी जाहीर करावी, उत्पादन शुल्क विभागाच्या एमपीएससीतर्फे भरण्यात येणाऱ्या जागा  वाढवाव्यात. सध्या 33 जागांची जाहीरात आली असून, 5 ते 6 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत, पोलिस भरतीचे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे, शिक्षक भरतीचे बाजारीकरण थांबवून भरती प्रक्रिया पूर्ण करावी, अशा मागण्याचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले.


‘एमपीएससी’ च्या कार्यप्रणालीत पारदर्शकता ठेवा

 मोर्चा काढलेल्या उमेदवारांनी कार्यप्रणालीत पारदर्शकता यासाठी विविध मागण्यांकरिता घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. महापोर्टल बंद झालेच पाहिजे, एमपीएससीमध्ये पादर्शकता आलीच पाहिजे, पीएसआयची स्वतंत्र परीक्षा घेतलीच पाहिजे. अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. आंदोलनात अध्यक्ष राज आवाड, उपाध्यक्ष दिगांबर वैद्य, सचिव अंकुष चौरे, संघटक बालाजी दळवे, रवी लोणीकर, अमोल गायकवाड, विवेक हजारे, जयदीप जाधव, प्रदीप घोडके, नारायण पाटील, शहारुख पठाण आदींचा समावेश होता. 

बातम्या आणखी आहेत...