आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Students Protest After Staff Masturbates In Front Of Girl, Warden Blames Her Clothes

गर्ल्स हॉस्टेलमध्ये विद्यार्थिनीला पाहून मास्टरबेट करत होता कर्मचारी, वार्डनने दिले मुलीच्या कपड्यांना दोष; हजारो विद्यार्थ्यांची निदर्शने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - तामिळनाडूच्या एसआरएम महाविद्यालयाच्या परिसरात गुरुवारी रात्रीपासूनच हजारो विद्यार्थ्यांनी निदर्शने सुरू केली. याच परिसरात गर्ल्स हॉस्टेलच्या एका कर्मचाऱ्याने विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केले. तिने यासंदर्भात वार्डनकडे तक्रार देखील केली. परंतु, त्या वार्डनने कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करणे सोडून त्या विद्यार्थिनीच्या कपड्यांनाच दोष दिला. यावर संतप्त विद्यार्थ्यांनी निदर्शने सुरू केली. ही घटना कांचीपुरम जिल्ह्यातील एसआरएम इंस्टिट्युट ऑफ सायन्स अॅन्ड टेक्नोलॉजी कॅम्पसमध्ये घडली आहे. 


लिफ्टमध्ये विद्यार्थिनीसमोर मास्टरबेट करत होता कर्मचारी
एका प्रसिद्ध माध्यमाशी संवाद साधताना पीडित विद्यार्थिनीने आपबिती सांगितली. एसआरएम इंस्टिट्युटच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये एक विद्यार्थिनी दुपारी लिफ्टने चौथ्या मजल्यावर जात होती. अचानक त्याच लिफ्टमध्ये गर्ल्स हॉस्टेलचा गार्डनर सुद्धा चढला. विद्यार्थिनीने चौथ्या मजल्यावर जाण्यासाठीचे स्विच दाबले. यानंतर विकृत कर्मचाऱ्याने तिच्यासमोरच मास्टरबेट करण्यास सुरुवात केली. यावर प्रचंड घाबरलेल्या मुलीने लिफ्टमधून उतरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने तिला उतरू दिले नाही आणि सहाव्या मजल्याचे यानंतर आठव्या मजल्याचे बटन दाबले. जोपर्यंत ती मदतीसाठी मोठ-मोठ्याने ओरडली नाही तोपर्यंत विकृताने तिला अडवून ठेवले. 

 

BREAKING:2nd Year Girl Sexually Abused By A Worker Inside Hostel Elevator In SRM University.Students Protest As College Is Trying To Suppress The Matter To Save Its Image. Warden Allegedly Blamed The Girl For Wearing Short Clothes. #Chennai #SRMUniversitypic.twitter.com/gZagApYIfG

— Sir Jadeja (@SirJadeja) November 22, 2018

वार्डनने दिला विद्यार्थिनीच्या कपड्यांना दोष...
विद्यार्थिनीने आपल्यासोबत घडलेला प्रकार वेळीच रुम पार्टनर्सला सांगितला आणि त्यांनी आणखी विद्यार्थी गोळा केले. सुरुवातीला सर्वांना वार्डनच्या कार्यालयात धाव घेत घडलेल्या प्रकरणाची माहिती दिली. परंतु, वार्डनने कर्मचाऱ्यावर काहीही कारवाई न करता विद्यार्थिनीच्या कपड्यांनाच दोष देण्यास सुरुवात केली. विद्यार्थिनीच्या कपड्यांमुळेच हा प्रकार घडला असे तिने सांगितले. यावर संतप्त विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये एकच गदारोळ केला. विविध विद्यार्थी संघटनांचे नेते एकत्रित आले आणि हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. यावेळी कॅम्पसच्या काही विद्यार्थ्यांनी व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यामध्ये प्रशासनाने हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना कसे आत ठेवून गेट बंद केले आणि विद्यार्थ्यांनी ते कसे तोडले हे दिसून आले. 

 


कुलगुरू म्हणाले, चौकशी करू
एसआरएम विद्यापीठाच्या कुलगुरूंनी विद्यार्थ्यांचे आरोप फेटाळून लावले. यानंतर माध्यमांवर या विषयी चर्चा होत असताना विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दखल घेतली. विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या तक्रारीवर चौकशी केली जाईल. यात कर्मचारी दोषी सापडल्यास त्याच्या विरोधात योग्य कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले आहेत. यासोबतच, विद्यार्थी या प्रकरणात विनाकारण गोंधळ घालत असल्याचे कुलगुरूंनी म्हटले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, शुक्रवारपासून या विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्याने सुट्या लागणार होत्या. अनेकांनी घरी जाण्यासाठी फ्लाइटचे तिकीटही बुक केले होते. परंतु, अचानक हे प्रकरण समोर आल्याने कॅम्पसमध्ये एकच गोंधळ आहे.

 

बातम्या आणखी आहेत...