आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्‍या अवघ्‍या 13 व्‍या वर्षी सोडला होता देश, कॉलेजमध्‍ये करत होता सफाईचे काम, परिस्थितीमुळे 9 वर्षांपासुन कुटुंबापासून राहिला लांब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिस्टल - इंग्‍लंडच्‍या ब्रिस्टल यूनिवर्सिटीतील सर्व विद्यार्थ्‍यांनी मिळुन यूनिवर्सिटीतील सफाई कर्मचा-याला त्‍याच्‍या आयुष्‍यातील सर्वांत मोठी भेटवस्‍तू दिली आहे. आर्थिक परिस्‍थतीमुळे हा कर्मचारी मागील 9 वर्षांपासून आपल्‍या घरी जाऊ शकला नाही. पण त्‍याने त्‍याची अडचण कोणाला न सांगता आपले काम अगदी प्रामाणिकपणाने करत राहिला. सफाई कर्मचारी आणि विद्यार्थीं यांच्‍यात चांगला जिव्‍हाळा होता. जेव्‍हा विद्यार्थ्‍यांना त्‍यांच्‍या अडचणी विषयी समजले तेव्‍हा विद्यार्थ्‍यांनी कर्मचा-याला मदत करण्‍याचे ठरविले. आणि ऑनलाईनद्वारे तब्‍बल दीड लाख रूपये गोळा केले.   

 

विद्यार्थ्‍यांना समजले कर्मचा-याचे दु:ख 

- ही गोष्‍ट आहे ब्रिस्‍टल युनिव्‍हर्सिटीमध्‍ये 12 वर्षांपासून सफाई कर्मचारी म्‍हणून काम करणा-या 65 वर्षीय हरमन गोर्डन यांची. आपल्‍या सकारात्‍मक आणि आनंदी स्‍वभामुळे गोर्डन विद्यार्थ्‍यांमध्‍ये प्रसिद्ध आहेत. 

- कामासोबतच त्‍यांचा जास्‍त वेळ विद्यार्थ्‍यांना आनंदी ठेवण्‍यात जातो तेही कोणतीही अपेक्षा न ठेवता. विद्यार्थी त्‍यांना आनंदाचे दुसरे स्‍वरूप मानतात. 

- हरमनने त्‍यांच्‍या हस-या चेह-यामागे खूप दु:ख लपवून ठेवले आहे. वयाच्‍या अवघ्‍या तेराव्‍या वर्षी ते जमैकाहुन इंग्‍लंडला आले होते. सुरूवातीला ते घरी ये-जा करत होते परंतु आर्थिक परिस्थितीमुळे नंतर ते बंद झाले. 

- मागील 9 वर्षांपासून हरमन घरी गेले नसल्‍याचेे विद्यार्थ्‍यांना समजलेे तेव्‍हा त्‍यांनी गोर्डनला मदत करायचा विचार केला. आणि निधी गोळा करण्‍यासाठी जस्‍टगिव्‍हींग हे ऑनलाईन पेज सुरू केले. 

- हरमन यांना पत्‍नीसोबत घरी जाता यावे आणि ब-याच वर्षांनी आपल्‍या परिवाराला भेटता यावे यासाठी विद्यार्थ्‍यांनी पैसे गोळा करण्‍यास सुरूवात केली. 

 

सफाई कर्मचा-याला दिले सरप्राइज गिफ्ट

- 230 पेक्षा जास्‍त विद्यार्थ्‍यांनी हरमनसाठी पाचच दिवसांत जवळपास दीड लाख रूपये गोळा केले. यानंतर हरमन यांना सरप्राइज देण्‍याची तयारी केली. 
- एका कार्यक्रमादरम्‍यान विद्यार्थ्‍यांनी हरमन यांना बोलावुन एक बंद पाकिट दिले. सुरूवातीला त्‍यांना काही समजले नाही. पण जेव्‍हा बंद पाकिट उघडले तेव्‍हा ते भारावुन गेले. 
- त्‍या पाकिटात हरमन यांनी केलेल्‍या कामाचे कौतुकपत्र आणि भेट म्‍हणून दीड लाख रूपये होते. यामुळे ते आपल्‍या घरी जाणार होते. 
- विद्यार्थ्‍यांनी दिलेल्‍या या सरप्राइजकडे पाहुन हरमन आपले आनंदाश्रु रोखु शकले नाही. या कार्यक्रमात विद्यार्थ्‍यांसोबत विद्यापीठाचे उप कुलगुरू आणि अध्‍यक्ष यांचीही उपस्थिती होती. 

 

बातम्या आणखी आहेत...