आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 Pics: इतक्या सुंदर आहेत या देशातील महिला सैनिक; पाहताक्षणी पडाल प्रेमात...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - इस्रायलचा गेल्या 70 वर्षांपासून शेजारी पॅलेस्टाइनसोबत संघर्ष सुरू आहे. केवळ पॅलेस्टाइनच नव्हे, तर इस्रायलने आतापर्यंत इराण, इराक, सीरिया, येमेन, सौदी अरेबिया, जॉर्डन यासारख्या आखाती देशांवर सुद्धा हल्ले केले आहेत. आणि ती सर्वच युद्ध इस्रायलने जिंकली. नेहमीच शत्रूंविरोधात हल्ल्यासाठी तयार राहणाऱ्या आणि अतिशय कमी लोकसंख्या असलेल्या देशास मोठ्या प्रमाणात सैनिकांची गरज असते. त्यामुळेच, इस्रायलमध्ये प्रत्येकाला आर्मी जॉइन करणे बंधनकारक आहे. यात पुरुष किंवा स्त्री असा भेदभाव केला जात नाही. इस्रायलमध्ये राहणारे कट्टर ज्यू आणि अरबी मुस्लिम त्यास अपवाद आहेत.


34 टक्के महिला लष्करात...
>> इस्रायलची एकूण लोकसंख्या सुमारे 86 लाख (2016) च्या जवळपास आहे. देशात सैनिकांची संख्या 31 लाखांच्या घरात आहे. ज्यात पुरुषांची संख्या 1,554,186 तर महिला सैनिकांची संख्या 1,514,063 इतकी आहे. 
>> अशा प्रकारे इस्रायल जगातील एकमेव असा देश आहे, जेथे लष्करात पुरुषांच्या बरोबरीने महिलांचीही संख्या आहे. लष्करी ट्रेनिंगमध्ये महिला किंवा पुरुष असा कोणताही भेदभाव ठेवला जात नाही. जितके हार्ड ट्रेनिंग पुरुषांना दिले जाते तेवढेच ते महिलांनाही दिले जाते.


अरब देशांसोबतच्या युद्धानंतर महिलांना दिले गेले स्थान
>> महिलांना आर्मीत भरती करण्याची प्रक्रिया 1948 च्या (अरब कंट्रीज-इस्रायल युद्ध)नंतर सुरु झाली. पुरुषांची संख्या कमी असल्याने सुमारे 20 हजार महिलांना आर्मीत भरती केले गेले. या युद्धात इस्त्रायल एकटा होता तर दुस-या बाजूने जॉर्डन, लेबनान, इजिप्त, सीरिया, येमेन आणि सौदी अरब असे देश होते. 
>> या भयानक युद्धात इस्त्रायल लष्कराला सैनिकांचा तुटवडा जाणवू लागताच सरकारने महिलांसाठीही दारे उघडली. दुसरीकडे, तेथील ज्यू महिलांनीही अशी काही हिंमत दाखवली जगात इस्त्रायलीचे कौतुक झाले. 
>> यानंतर टप्प्या-टप्प्याने इस्रायली लष्करात महिलांची संख्या वाढत गेली, जी आता पुरुषांच्या बरोबरीने म्हणजे 15 लाखांच्या वर महिला सैनिक आहेत. शेजारील शत्रू राष्ट्र पॅलेस्टिनी दहशतवादी कारवाया कायम करत असल्याने महिला सैनिकांसाठी एवढ्या कठिण व कडक नियम, पद्धती आहेत की, इस्रायली महिलाही या दहशतवाद्यांना पुरुन उरतात.


कॉमबॅट रोलमध्‍ये महिला
क्लास 16 एनुसार लष्‍करी सेवेत महिला कॉमबॅट सोल्जर्ससाठी 3 वर्ष सेवा देणे सक्तीचे आहे. 38 वर्षापर्यंत रिझर्व्ह सर्व्हिस सुरु ठेवावी लागते. प्रत्येक वर्षी 1500 महिला कॉम्बेट सोल्जर्स आयडीएफमध्‍ये येतात. 2000 पूर्वी महिलांना कॉमबॅट रोलसाठी निवडले जात नव्हते. 2014 मध्‍ये आयडीएफने ओशरत बचरला इस्रायलची पहिली महिला कॉमबॅट बटालियनचा कमांडर निवडले.


पुढील स्लाइड्सवर पाहा, इस्रायलच्या ग्लॅमरस सैनिकांचे आणखी काही फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...