Home | National | Delhi | subhash chandra bose love story

सुभाषचंद्र बोस यांची लव्‍ह स्टोरी; ऑस्ट्रियातील टायपिस्टवर जडला होता जीव

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 23, 2019, 12:00 AM IST

ऑस्ट्रियात झाली पहिली भेट

 • subhash chandra bose love story

  दिल्ली- नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती आहे. 23 जानेवारी 1897 रोजी त्यांची जन्म झाला होता. उडीसातील कटकमध्ये त्यांचा जन्म झाला. ते भारतीय स्वतंत्र्य लढ्याचे सर्वात अग्रणी नेते होते. त्यांनी आझाद हिंदी सेनेची स्थापना केली. 18 ऑगस्ट 1945 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे नेताजींच्‍या लव्‍ह स्‍टोरी बद्दल. सुभाषचंद्र बोस आणि एमिली यांचे प्रेम आणि त्‍यांच्‍या लग्‍नापर्यंतचा हा खास प्रवास...

  ऑस्ट्रियात झाली पहिली भेट
  वर्ष 1934 मध्‍ये नेताजी उपचारासाठी ऑस्ट्रिया येथे गेले होते. त्‍या ठिकाणी त्‍यांना बरेच दिवस राहावे लागणार असल्‍याने फावल्‍या वेळात आपण आपले आत्‍मचरित्र लिहावे, असे त्‍यांना वाटले. त्‍यांनी आपला विचार एका मित्राला सांगितला आणि त्‍यासाठी एक टंकलेखक (टायपिस्ट) शोधण्‍याची जबाबदारीही सोपवली. त्‍याच्‍या माधूनच त्‍यांनी या कामासाठी एमिली या युवतीची नियुक्‍ती केली. नेताजी एमिली यांना आपली आत्‍मकथा डिक्टेट करत असत. दरम्‍यान, दोघेही एकमेकांच्‍या प्रेमात पडले. 1937 मध्‍ये त्‍यांनी गुप्‍तपणे लग्‍नही केले. या दाम्‍पत्‍याला 21 नाव्‍हेंबर 1942 रोजी व्हिएन्ना येथे एक मुलगी झाली. त्‍यांनी तिचे नाव अनीता ठेवले.

  एमिली शेंकलला करावी लागली पोस्‍टात नौकरी
  नेताजी यांनी एमि‍ली सोबत पहिल्‍यांदा गुप्‍तपणे लग्‍न केले. नंतर फेब्रुवारी 1942 मध्ये त्‍यांनी पुन्‍हा हिंदू पद्धतीने लग्‍न केले. 8 फेब्रुवारी 1943 रोजी पाणबुडीत बसताना सुभाषचंद्रांनी एमिलीचा निरोप घेतला ती त्या दोघांमधील अखेरची भेट. पुढे अनीताला घेऊन आपल्‍या कुटुंबाचा गाडा हाकण्‍यासाठी एमिली यांना पोस्‍टात नौकरी करावी लागली. अनीता यांच्‍या माहितीनुसार, आपल्‍या आईने नेताजी यांच्‍यासोबत असलेल्‍या नात्‍याला कधी सार्वजनिक केले नाही. आपला पती कोण आहे, हे गुप्‍त ठेवून तिने या जगाचा निरोप घेतला. आईने सांगितले होते, रोजच्‍या प्रमाणे ती सायंकाळी रेडिओवर बातम्‍या ऐकत होती. 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातानंतर सुभाषचंद्रांचा शेवट झाल्‍याचे तिला कळाले. त्यानंतर 1995 मध्‍ये तिचे निधन झाले.

  पुढील स्‍लाइडवर वाचा दोघे पाठवायचे एकमेकांना पत्र....

 • subhash chandra bose love story
  एमिली यांच्‍या कुटुंबासोबत नेताजी.

  दोघांमध्‍ये होता पत्र व्‍यवहार


  सुभाषचंद्र व एमिली यांनी एकमेकांना अनेक पत्रे लिहिली होती. सुभाषचंद्रांनी पाठविलेली पत्रे एमिलीने जपून ठेवली होती. जून 1993  मध्ये एमिलीने हा अमोल ठेवा, तिचे पुतणे व शरदचंद्र बोसांचे पुत्र सिसिर बोस यांच्या स्वाधीन केला. समग्र सुभाष साहित्याचा भाग म्हणून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने ही पत्रे ग्रंथरुपाने 1994 साली प्रसिद्ध केली आहेत.
   
  पुढील स्‍लाइडवर वाचा आता अनीता काय करतात?

   

 • subhash chandra bose love story

  अनीता या काय करतात


  अनीता या जर्मनीच्‍या आउग्सबुर्ग जिल्‍ह्यातील 15 हजार लोकसंख्‍या असलेल्‍या  स्टटबेर्गन शहराच्‍या उपमहापौर होत्‍या. अर्थतज्‍ज्ञ म्‍हणून त्‍यांचा लौकिक आहे. अनेक वेळा त्‍या भारतात आलेल्‍या आहेत.  पेटर अरुण, थोमस कृष्णा आणि माया करिना अशी त्‍यांच्‍या मुलांची नावे आहेत. ज्‍या वेळी त्‍या शेवटचे भारतात आल्‍या होत्‍या तेव्‍हा त्‍यांनी सांगितले होते की, नेताजींचा मृत्‍यू झाला तेव्‍हा त्‍या केवळ अडीच वर्षांच्‍या होत्‍या.
   
  पुढील स्‍लाइडवर वाचा अनीता यांनी कुणासोबत केले लग्‍न?

   

 • subhash chandra bose love story
  भारतभेटीदरम्‍यान मार्टिन आणि अनीता.

  मार्टिन प्फॉफसोबत झाले अनीता यांचे लग्‍न


  बेंगलुरूमध्‍ये अनीता यांची भेट मार्टिन प्फॉफ यांच्‍यासोबत झाली. त्‍यावेळी मार्टिन हे अंध लोकांसाठी सामाजिक कार्य करत होते. ते मूळ ऑस्ट्रियायाचे आहेत. या दोघांनी ऑस्‍टेलियात लग्‍न केले. शिवाय सोबतच अर्थशास्‍त्रात पीएचडी केली आणि  जर्मनीच्‍या आउग्सबुर्ग यूनिवर्सिटीमध्‍ये प्राध्‍यापक म्‍हणून रुजूही झाले. पुढे  मार्टिन हे जर्मनीच्‍या सोशल डेमोक्रेटिक पार्टीच्‍या माध्‍यमातून राजकारणात गेले आणि खासदार झाले.
   
  पुढील स्‍लाइडवर वाचा बोस कुटुंबाच्‍या कोणत्‍या दुर्मिळ वस्‍तू आहेत अनीतांकडे...

   

 • subhash chandra bose love story
  राष्‍ट्रपतींना सुभाषचंद्र बोस यांच्‍यावर लिहिलेले पुस्‍तक भेट देताना अनीता.

  नेताजींच्‍या आईच्‍या बांगड्या आहेत अनीताकडे

   

  नेताजींची आई प्रभावती यांच्‍या सोन्‍याच्‍या बांगड्या अनीता यांच्‍याजवळ आहेत. प्रभावती यांनी त्‍या आपल्‍या सर्वांत लहान सुनेसाठी तयार करून घेतल्‍या होत्‍या. त्‍यांनी त्‍यांच्‍या मृत्‍यूपूर्वी त्‍या  शरदचंद्रच्‍या पत्नी विभावती यांच्‍याकडे सोपवल्‍या आणि सुभाषचंद्र बोस यांच्‍या पत्‍नीला त्‍या देण्‍याचे सांगितले. आपल्‍या आजीच्‍या या बांगड्या अनीता यांनी अजूनही सांभाळून ठेवल्‍या आहेत.
   
  पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...

   

 • subhash chandra bose love story
 • subhash chandra bose love story
 • subhash chandra bose love story

Trending