आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

 सुबोध भावे परत येतोय....  "जय जय महाराष्ट्र माझा" म्हणत घडवणार लोककलांनी समृध्द महाराष्ट्राचं दर्शन

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः सोनी मराठी वाहिनीवर येत्या 2 डिसेंबरपासून लोककलांवर आधारित "जय जय महाराष्ट्र माझा" हा नवीन कार्यक्रम सुरु होतोय. महाराष्ट्रावर प्रेम असणाऱ्या प्रत्येकाचा आणि महाराष्ट्र जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठीचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राने आजवर जपलेल्या परंपरांचं, संस्कृतीचं आणि लोककलांचं सिंहावलोकन होणार आहे. विशेष म्हणजे लोककलांचं ज्ञान असणारा अभिनेता सुबोध भावे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे.

   

बातम्या आणखी आहेत...