आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुबोध भावे झाला ‘भयभीत’, पोस्टर रिलीज करुन सांगितली चित्रपटाची रिलीज डेट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः भय बऱ्याच वेळा प्रसंगानुरूप असते, त्यामुळे ते कोणत्या गोष्टीचं वाटेल हे काही सांगता येत नाही. अभिनेता सुबोध भावेला सध्या कोणत्या तरी भयाची चाहूल लागली असून या अनामिक भीतीमुळे तो भयभीत झाला आहे. ही भीती नेमकी कसली आहे ? हे जाणून घ्यायचं असेल तर आगामी 28 फेब्रुवारीला ते जाणून घेता येईल. ‘भयभीत’ हा सुबोधचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या या पोस्टरवर सुबोध भावेचा भयभीत झालेला लुक पहायला मिळतोय. अभय सिन्हा, ‘अॅक्च्युल मुव्हीज प्रोडक्शन्स’ आणि ‘ब्राऊन सॅक फिल्म्स प्रा. लि’ यांची  प्रस्तुती असलेल्या ‘भयभीत’ चित्रपटाचे दिग्दर्शन दिपक नायडू यांचे असून निर्मिती शंकर रोहरा, दिपक नारायणी यांची आहे. सुबोध भावे यांच्यासोबत पूर्वा गोखले, गिरीजा जोशी, मधू शर्मा, मृणाल जाधव, यतीन कार्यकर हे कलाकार असणार आहेत. अविनाश रोहरा, पवन कटारिया, समीर आफताब, प्रभाकर गणगे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. कलादिग्दर्शन एकनाथ राणे तर साऊंड डिझायनर सतीश पुजारी आहेत. गीतकार मंदार चोळकर असून संगीत व पार्श्वसंगीताची जबाबदारी नकाश अझीज यांनी सांभाळली आहे. कथा एस.ए तर पटकथा आणि संवाद दिनेश जगताप यांचे आहेत. छायांकनाची जबाबदारी वासू यांनी सांभाळली असून नृत्यदिग्दर्शन किरण गिरी यांचे आहे. अॅक्शन शकिल शैकिल यांची आहे. कार्यकारी निर्माता अनिल सिंग आहेत.  आजवर भयपट साकारण्याची संधी क्वचित मिळाल्याने ‘भयभीत’ साठी सुबोध खूपच उत्सुक आहे.