Home | Bollywood | Marathi Cinekatta | Subodh Bhaves Film Balgandharva Look Trail Photos

B'day: सुबोधने साकारलेल्या या भूमिकेने घडविला मराठी चित्रपटात इतिहास, असा घडला 'बालगंधर्व'

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 09, 2018, 12:37 PM IST

सुबोधने केलेल्या सर्वच भूमिका आतापर्यंत चांगल्याच गाजल्या आहेत.

 • Subodh Bhaves Film Balgandharva Look Trail Photos

  एन्टरटेनमेंट डेस्क - मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रगल्भ अभिनेता सुबोध भावे आज त्याचा 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. यासोबतच त्याचा 'काशीनाथ घाणेकर' हा सिनेमा दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर रिलीज झाला. प्रेकक्षकांची या चित्रपटाला चांगली पसंती मिळतेय. यामधील त्याती घाणेकरांची भूमिका चांगली गाजतेय. सुबोधने केलेल्या सर्वच भूमिका आतापर्यंत चांगल्याच गाजल्या आहेत. त्यात बालगंधर्वचे नाव घेतले जाणार नाही असे होऊच शकत नाही. आज आपण ताच्या बालगंधर्वमधील भूमिकेविषयी सविस्तर जाणुन घेऊया. स्त्रीरुपात आतापर्यंत इतके सुंदर कोणीच दिसू शकणार नाही इतका सुरेख सुबोध भावे त्या चित्रपटात दिसला होता. असा मिळाला होता चित्रपट...

  सुबोध असा बनला बालगंधर्व...
  फोटोग्राफर अतुल शिधाये यांनी याबाबतीत एक आठवण सांगितली आहे. त्यांनी म्हटले, "एके दिवशी अचानक सुबोध भावेचा मला फोन आला आणि त्याने एक्सपिरीमेंटल फोटोशूट करायचे आहे असे सांगितले. सुबोध म्हटला, मी माझा पर्सनल मेकअप आर्टीस्ट आणि संयोगिता भावे कॉश्च्युम्स आणि ज्वेरली अरेंज करणार आहे. तु मला फक्त झटपट काही फोटोज् काढून दे. ते फोटो मी नितीन देसाई यांना दाखवणार आहे कारण ते बालगंधर्व यांच्या आयुष्यावर एक चित्रपट बनवत आहेत. हे संभाषण झाल्यावर एका तासातच सुबोध त्याच्या टीमसह आला आणि काही फोटोज् घेऊन तो गेला." हे फोटोज् जर आता पाहिले तर खरोखरीच नितीन यांनी सुबोधची केलेली निवड किती योग्य होते ते कळते.

  असे मिळाले पुरस्कार...
  सुबोधला बालगंधर्व या चित्रपटातील भूमिकेसाठी 2012 साली झी गौरव पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि 2011 साली मिफ्ता येथे सर्वोत्कृष्ट अभिनेता असा पुरस्कार मिळाला.
  (सर्व फोटो- अतुल शिधाये, फेसबुक)

  पुढच्या स्लाईडवर पाहा, फोटोग्राफर अतुल शिधाये यांनी सुबोधचे केलेले फोटोशूट...

Trending