आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड- धनगर आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करा या मागणीसाठी आज (बुधवार) सकाळी दहा वाजता यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष भारत सोन्नर यांच्या नेतत्वाखाली मुंबई येथील आझाद मैदानावर सुंबरान आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देवुन धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आश्वासन दिले. या आंदोलनास राज्यातुन हजारो कार्यकर्ते मुंबईल दाखल झाले होते त्यांनी पारंपरिक ढोल,घोंगड्या व भंडारा उधळून मुंबईकरांचे लक्ष वेधले.
बुधवारी सकाळी दहा वाजता मुंबईतील आझाद मैदानावर सुंबरान आंदोलन सुरू झाले तेंव्हा यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी या आंदोलनाचे नेतृत्व करत धनगर आरक्षणासाठी सरकारला धारेवर धरत आंदोलकावरील गुन्हे मागे घ्या ,शेळी मेंढी विकास महामंडळाच्या ऐवजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विकास महामंडळ असे नामकरण करा व या महामंडळाला एक हजार कोटीची तरतूद करा,धनगर समाजाला आदिवासी धर्तीवर योजना लागू केल्या आहेत त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशा विविध मागण्या लावुन धरल्या.
या सुंबरान आंदोलनामुळे आझाद मैदानासह परिसर पिवळा झाला होता. या आंदोलनाचे लोन थेट विधान भवनात पोचले. आंदोलनामध्ये हजारो ढोलकरी काठी घोंगड पिवळा फेटा बांधून या आंदोलनात सहभागी झाले होते. मंत्री विजय वडेट्टीवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री दत्तात्रय भरणे व धनगर समाज नेते भारत सोन्नर धनगर समाजाचे शिष्ठमंडळ यांची बैठकी होवुन धनगर समाजाला लागू करण्यात आलेल्या आदिवासींच्या धर्तीवर धनगर समाजाला लागु करण्यात आलेल्या योजनेची तात्काळ अमलबजावणी करण्याचे आदेश व दहा हजार घरकुल तात्काळ मंजूर करण्याचे आदेश मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.
नाहीतर कायदा हातात घेवू...
गेल्या 70 वर्षापासून धनगर समाज शांत आहे भाजपाने धनगर समाजाचा विश्वासघात केला असून महाविकास आघाडीने कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये धनगर आरक्षण देण्याबाबतचा विश्वास दिला असून त्याची अंमलबजावणी तात्काळ करा अन्यथा कायदा हातात घेतला जाईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची राहील.
भारत सोन्नर, संस्थापक अध्यक्ष ,यशवंत सेना
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.