आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी सुब्रमण्यम स्वामींनी सुचवला उपाय, म्हणाले- 'पाककडे जाणारी जहाजं थांबवून, व्यापार बंद करावा'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारताने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर आतापर्यंत पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. पाकने भारतीय वायूसेनेच्या एअर स्ट्राईकनंतर भारतीय विमानांसाठी हवाई मार्ग बंद केला होता. परत एकदा काही कारणास्तव भारतीय विमानांसाठी हवाई मार्ग पाकने बंद केला आहे. आता पाकची कोंडी करण्यासाठी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींनी एक उपाय सुचवला आहे. पाकिस्तानसाठी सर्वात महत्त्वाचे असलेले कराची बंदर बंद करणे भारताच्याच हातात असल्याने, भारताने ही कारवाई करावी असे त्यांनी सुचवले आहे.
 
मोदी सरकारला सुब्रमण्यम स्वामींनी एक सल्ला दिलाय. पाकिस्तानने आपल्या नागरी विमानांसाठी हवाई मार्ग बंद केल्यास, भारतानेही कराची बंदर ब्लॉक करावे. अरबी समुद्रातून पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या जहाजांचा मार्ग भारताला बंद करता येईल, असे ट्वीट स्वामींनी केले आहे.
 
कराची पोर्ट ट्रस्टच्या माहितीनुसार, या कराची बंदरावर वर्षभरात अंदाजे 1600 जहाजं येतात. भारताने अरबी समुद्रातून जाणारा मार्ग बंद केल्यास कराचीला जाणारी 60 टक्के जहाजं थांबवावी लागतील, म्हणजेच यासाठी पर्यायी मार्ग शोधावा लागेल. या निर्णयाचा फटका पाकिस्तानसोबतच चीनलाही बसेल. चीनची मालवाहू जहाजं बंगालच्या उपसागरातून श्रीलंकेमार्गे अरबी समुद्रातूनच कराचीला जातात.

            भारताने अरबी समुद्रातील मार्ग बंद केल्यास पाकिस्तानचा दक्षिण पूर्व आशियासोबत होणारा व्यापार थांबवावा लागेल, किंवा आफ्रिका खंडातून जहाजं न्यावी लागतील. यामुळे पाकिस्तानमध्ये जहाज पोहोचण्यासाठी लागणारा वेळही वाढेल आणि खर्चही वाढू शकतो.    

बातम्या आणखी आहेत...