आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईः सबसिडीचे सिलिंडरच्या किंमतीत 25 रुपये तर विना सबसिडी सिलेंडरच्या किंमतीत 1.23 रुपयाची वाढ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जून महिन्याची सुरुवात होताच आता स्वयंपाक महागला आहे. याच महिन्यापासून सबसिडी आणि विना सबसिडीच्या गॅस सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. त्यानुसार, सवलतीचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांसाठी सिलिंडरची किंमत 25 रुपयांनी तर सवलतीचा लाभ न घेणाऱ्या अर्थात बिगर सबसिडीच्या सिलिंडरची किंमत 1.23 रुपयांनी मागली आहे.  देशभर 1 जूनपासून नवीन दर लागू करण्यात आले आहेत. सरकारी इंधन कंपन्या HPCL, BPCL, IOC या सर्वांनी नवीन किमती लागू केल्या. त्यानुसार, एक सबसिडी सिलिंडर विकत घेण्यासाठी दिल्लीकरांना 497.37 रुपये आणि मुंबईकरांना 495.09 रुपये मोजावे लागतील. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने ही दरवाढ करण्यात आले आहेत.

 

गेल्या महिन्यात सुद्धा अशाच स्वरुपाची एलपीजी गॅस दरवाढ लागू करण्यात आली होती. 1 मे पासून लागू झालेल्या किंमतींमध्ये सबसिडीच्या सिलिंडरची किंमत 28 पैशांनी वाढवण्यात आली होती. 1 जूनपासून मुंबईत विना सबसिडीचे सिलिंडर आता 709.50 रुपयांत मिळणार आहे. IOC च्या वेबसाइटवरच्या दिलेल्या माहितीनुसार, सबसिडीच्या सिलिंडरची किंमत दिल्लीत 497 रुपये, मुंबईत 495.09 रुपये, कोलकात्यात 500.52 रुपये आणि चेन्नईत 485.25 रुपये इतकी आहे. सद्यस्थितीला सबसिडीधारक ग्राहकांना दरवर्षी 12 सिलिंडर सवलतीच्या दरात मिळतात. पूर्ण पैसे भरल्यानंतर सवलतीची रक्कम थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाते. विना सबसिडीच्या ग्राहकांना गॅस सिलिंडरची वार्षिक मर्यादा लागू होत नाही.

बातम्या आणखी आहेत...