Interview / ‘संकल्पातून सफलता’ : जे अजूनही परदेशात नाही गेलेत त्यांना नेण्याचे ध्येय : नीम हॉलिडे प्रा. लि. चे मनीष अग्रवाल

‘दिव्य मराठी’शी संवाद साधताना (उजवीकडे) मनीष अग्रवाल ‘दिव्य मराठी’शी संवाद साधताना (उजवीकडे) मनीष अग्रवाल

आम्ही डिस्काउंट देत नाही, तरीही आमच्या किफायतशीर पॅकेजमुळे ९२ टक्के ग्राहक पुन्हा येतात 
 

दिव्य मराठी नेटवर्क

Sep 03,2019 08:57:00 AM IST

दै. दिव्य मराठीच्या ‘संकल्पातून सफलता’शृंखलेत टूर अँड ट्रॅव्हल इंडस्ट्रीत आपली विशिष्ट ओळख निर्माण करणाऱ्या नीम हॉलिडे प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक मनीष अग्रवाल यांनी मनमोकळी बातचीत केली. यात त्यांनी भारतीय पर्यटकांच्या आवडत्या ठिकाणांपासून टुरिस्ट मार्केटच्या आजच्या स्थितीबाबत प्रश्नांना उत्तरे दिली. याबरोबरच त्यांनी क्रूझ, साहसी आणि आरोग्य पर्यटनाच्या क्षेत्रातील भारताच्या संधींवरही प्रांजळपणे टिप्पणी केली. त्यांच्याशी झालेल्या बातचितीचे मुख्य अंश :

> प्रश्न : तुम्ही २००१ मध्ये एक छोटे ऑफिस आणि ५ जणांचा स्टाफ घेऊन कंपनी सुरू केली. त्या वेळी काय अडचणी आल्या?
उत्तर : पर्यटनाबाबत मी फार उत्साही होते. खूप छोट्या स्वरूपात सुरुवात केली. त्या वेळी मार्केटही छोटे होते. मी देशांतर्गत (डोमेस्टिक) पर्यनापासून सुरुवात केली. त्या वेळी ५० लाखांचाही व्यवसाय होत नव्हता.
गेल्या १९ वर्षांत आम्ही बरीच प्रगती केली. त्या वेळी गोव्यात ऑफ सीझनमध्ये हॉटेल बंद केली जात असत. तिथे ऑक्टोबर ते मार्च हॉटेल व्यवसाय आणि नंतर आराम अशी स्थिती होती. ऑफ सिझनमध्ये हॉटेल सुरू ठेवायला त्यांना तयार केले.


> प्रश्न : छोट्या ऑफिसपासून गोरेगावच्या सिनर्जी पार्कमध्ये हेड ऑफिस सुरू करण्यास किती वर्षे लागली?
उत्तर : यादरम्यान जीवनात अनेक उतार-चढाव आले. खूप बदलही झाले. मी यातून शिकलो की, ज्याने बदल स्वीकारला नाही तो मागे पडतो. बदल स्वीकारून ध्येय निश्चित केल्यास अनेक पटींनी विकास होतो.


> प्रश्न : तुमचे मुंबईत मुख्यालय, पुणे-बंगळुरूला ब्रँच ऑफिस आणि ३५ हून अधिक फ्रँचायझी आहेत. यातून किती लोकांना रोजगार मिळाला?
उत्तर : आमच्या माध्यमातून ४००-५०० लोकांना प्रत्यक्ष व हजारो-लाखो लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळाला.


> प्रश्न : तुम्ही दूरदृष्टीचे व्यावसायिक आहात. लोकांनी कुटुंबासह परदेशात फिरायला जावे, असे तुम्हाला वाटते. तुम्ही बुकिंगच्या वेळी डिस्काउंट देता?
उत्तर : त्यांनी कुठले पॅकेज घ्यावे हे त्यांच्या कॅटेगरीनुसार समजावले जाते. आणि गेल्या १९ वर्षांच्या अनुभवातून शिकून आम्ही झीरो डिस्काउंटवर काम करतो. आमच्याकडे एकच दर असतात. ग्राहकाला पहिल्यांदा आणि तिसऱ्यांदाही जगभ्रमंतीसाठी एकच दर असतो. १३०० एजंट आमच्यासाठी बुकिंग करतात. सगळे सारख्याच दराने बुकिंग करतात. पॅकेज घेताना त्यात काय मिळेल, याची कल्पना देतो. त्यामुळे ९२ टक्के ग्राहक पुन्हा येतात.


> प्रश्न : डोमेस्टिक टूर ऑपरेटरचे काम किती वर्षे केले?
उत्तर : सुरुवातीची तीन-चार वर्षे. त्यानंतर आम्ही आंतरराष्ट्रीय पर्यटन व्यवसाय सुरू केला.


> प्रश्न : भारतीय पर्यटकांना वर्ल्ड टूरला नेण्याची कल्पना कशी सुचली?
उत्तर : वर्ल्ड टूरचे मार्केट चांगले समजून घेऊन १५ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे काम करत आहोत. बहारिनची लोकसंख्या आहे १८ लाख व तिथे दरवर्षी भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या १.२० कोटी. तेथील पंतप्रधान पर्यटनाला चालना देतात.


> प्रश्न : युरोपियन मार्केट कसे आहे? तिथल्या कुठल्या स्थळावर जास्त जाण्यास भारतीय प्राधान्य देतात?
उत्तर : युरोप हे नेहमीच भारताचे मुख्य पर्यटनस्थळ असते. आम्ही युरोप पर्यटन किफायतशीर केले आहे. चार लोकांचे कुटुंब अडीच लाखांत हा टूर करू शकते. भारतीयांना स्वित्झर्लंड आवडते. आयफेल टॉवरमुळे पॅरिसला जातात. परदेशी डेस्टिनेशनला प्रसिद्धी देण्यात बॉलीवूडचे मोठे योगदान आहे.


> प्रश्न : भारतीय विद्यार्थी परदेशात जाण्याचे तुमच्या मते कारण काय?
उत्तर : भारतातून आंतरराष्ट्रीय टूरला जाण्याची संख्या वाढतेय. आता नासा, सिंगापूर, मलेशियाला शालेय सहली जातात. नासा विद्यार्थ्यांत लोकप्रिय आहे. आधी भारतीय जेवण मिळत नव्हते. जास्त विमाने नव्हती. भाडे महाग होते. आता हिमाचल, केरळपेक्षा विदेशवारी स्वस्त झालीय.


> प्रश्न : ऑस्ट्रेलिया, जपान, रशिया स्कँडिनेव्हियासारख्या देशांत तुम्ही व्यवसाय विस्तार करू इच्छिता. याचे कारण काय?
उत्तर : वेगळ्या पर्यटनस्थळांवर लक्ष केंद्रित करतोय. प्राग, बुडापेस्ट, व्हिएन्ना, स्कँडिनेव्हिया, बहारिन, मस्कत आणि रशिया छोटे डेस्टिनेशन होते. भारतीयांनी न पाहिलेल्या ठिकाणी त्यांना नेण्याचे आमचे लक्ष्य आहे. ज्यांनी १० वर्षांपूर्वी पासपोर्ट तयार केला, पण कुठे गेले नाहीत, त्यांना त्यांच्या बजेटमध्ये विदेशवारी करण्यावर आमचा फोकस आहे.


> प्रश्न : कोणत्या ठिकाणी जाण्यासाठी भारतीय सर्वाधिक बुकिंग करतात?
उत्तर : आम्ही किफायतशीर टूरसाठी प्रसिद्ध आहोत. त्यामुळे आमचे पॅकेज पाहून ते घेतात. दीड लाख बजेट असेल तर बहारिन, मस्कत, दुबाई, सिंगापूरच ठरवतात.


> प्रश्न : भारतात क्रूझ टुरिझमचे भविष्य तुमच्या मते कसे आहे?
उत्तर : क्रूझ टुरिझमला भारतात खूप संधी आहे, परंतु इन्फ्रास्ट्रक्चर नाही. भारताला मोठा समुद्रकिनारा आहे, परंतु क्रूझ टुरिझमच्या दृष्टीने विकसित नाही. व्हेनिसमध्ये क्रूझ टुरिस्टना मर्यादा घालावी लागते. तुर्कीने जगातील सर्वात मोठे क्रूझ टर्मिनल उभारले. भारतात या क्षेत्रात आणखी काम करण्याची गरज आहे.


> प्रश्न : अॅडव्हेंचर टुरिझम आणि आरोग्य पर्यटनाची वाढ तुम्हाला कशी दिसते?
उत्तर : न्यूझीलंडने साहसी पर्यटन सर्वाधिक विकसित केले. भारतात यात सुरक्षा स्तर अजून कमी आहे. मेडिकल टुरिझममध्येही भारताला खूप संधी आहेत कारण आपल्याकडे तज्ज्ञ डॉक्टर खूप आहेत आणि उपचार स्वस्त आहेत.


> प्रश्न : पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारकडून काही प्रयत्न होत आहेत?
उत्तर : पंतप्रधान मोदी आल्यानंतर पर्यटन क्षेत्राला १०० टक्के चालना मिळाली. विदेशी टुरिस्ट इथे आल्यावर त्याची तक्रार असल्यास त्यावर त्वरित कार्यवाही होते.


> प्रश्न : विशिष्ट राज्य, कॅटेगरी किंवा वर्ग कित्येक टूर ऑपरेटरचे लक्ष्य आहे. अशा स्पर्धेत ग्राहकांना तुम्ही कसे जोडता?
उत्तर : आमचा फोकस ग्राहकाच्या बजेटवर आहे. आम्ही नवीन बजेट कॅटेगरी तयार केली.

X
‘दिव्य मराठी’शी संवाद साधताना (उजवीकडे) मनीष अग्रवाल‘दिव्य मराठी’शी संवाद साधताना (उजवीकडे) मनीष अग्रवाल
COMMENT