जीवनात यशस्वी होण्याचे रहस्य सांगणारे 6 गुण

धर्म डेस्क, उजैन | Update - May 24, 2011, 07:35 PM IST

यशाची श्रृंखला अखंडित राहिल आणि मनालाही सुखशांती मिळेल...

 • success-life

  आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. स्पर्धा ही विरोधी भावनेला जन्म देत असते. यातून स्पर्धेत पुढे येण्यासाठी अनेकदा शॉर्टकट्स शोधले जातात. अशावेळी नैतिकतेलाही सोडचिठ्ठी दिली जाते. अशा मार्गाने आपण यशस्वी झालो तरी त्याने मनशांती मात्र मिळत नाही.
  असा कोणता मार्ग आहे का की त्या मार्गाने मिळालेल्या यशाचा आपला विरोधकदेखील सन्मान करेल, यशाची श्रृंखला अखंडित राहिल आणि मनालाही सुखशांती मिळेल...
  या चिरंतन प्रश्राचे उत्तर आपल्या शास्त्रांनी दिलेले आहे. शास्त्रांनुसार यशाचे सूत्र कर्म आहे. यश मिळविण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी कर्माला पुढील 6 गुणांची जोड दिल्यास शाश्वत यश मिळते.
  1. उद्योग... परिश्रमाला इच्छाशक्ती आणि संकल्पशक्तीची जोड दिली जाते.
  2. साहस... निर्भयतेने कर्म करीत निर्धारित लक्ष्यापर्यंत पोहोचणे. येथे नकारात्मकतेला स्थान नाही.
  3. धैर्य... अपयश आले तरी किंवा कठीण परिस्थितीतही मानसिक, शारीरिक आणि व्यवहारिकदृष्ट्या आपल्या मार्गापासून दूर न जाणे. शांतपणे यश मिळविण्यासाठी प्रयत्नरत रहाणे.
  4, बुद्धी... बुद्धीबल हे यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारे प्रमुख गुण आहे.
  5. शक्ती... यात मानसिक, शारीरिक आणि ज्ञानशक्तीचाही समावेश होतो.
  6. पराक्रम... यशस्वी होण्यासाठी कोणत्याही स्थितीत हार न मानण्याची वृत्ती.
  यशस्वी होऊ इच्छिणार्याच्या अंगी वरील सहा गुण असणे आवश्यक आहे.

Trending