आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांच्या चप्पलच्या दुकानातुन शिकले कौशल्य, 21 वर्षांच्या वयात उभी केली 1 कोटींची कंपनी...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- नेहमी म्हणल्या जाते की, वय आणि कौशल्याचा संबंध नसतो. ही म्हण भोपाळच्या हुसैन सैफीवर लागु होते. हुसैन त्या ठराविक मुलांमध्ये आहे, ज्यांनी फक्त 12 वर्षाच्या वयात C++ आणि एचटीएमएल (HTML) शिकणे सुरू केले होते. हुसैन आपल्या वडिलांच्या चपलाच्या दुकानात बसून यू-ट्यूब ट्यूटोरियलचा मदतीने कोडिंग शिकायचा. हुसैनने सांगितले की, शाळेत असतानाच त्याने अनेक वेबसाइट बनवल्या, जिथून पाइरेटेड फिल्म डाउनलोड करता येईल, तेव्हा त्याला माहित नव्हते की हा गुन्हा आहे. लीगल नोटिस मिळल्यानंतर त्याने वेबसाईट बंद केली आणि सरळ मार्गाने काम करू लागला.

 
लोकल रेस्त्रॉची वेबसाइट बनवायला मिळाले 5 हजार रूपये
हुसैन 2015 मध्ये 18 वर्षाच्या वयात फ़्रीलांस डेव्हलपर म्हणून काम करू लागला. हुसैन फ्रीलांसिंग फक्त इंटरनेटचे बील देण्यासाठी करू लागले. फ्रिलांसिंग करताना त्याला आयडिया आली आणि त्याने एका लोकल रेस्त्रॉच्या मालकाला त्यांची वेबसाइट बनवण्यासाठी विचारले. त्यानंतर हुसैनने त्यांच्यासाठी वेबसाईट बनवली आणि त्यासाठी त्याला 5 हजार रूपये मिळाले.

 

परदेशात आहेत हुसैनच्या कंपनीचे क्लायंट
त्याने या मिळालेल्या 5 हजारात आपला स्वत:चा स्टार्टअप, हैकर कर्नल (HackerKernel) सुरू केले आणि आजच्या तारखेला त्याचा स्टार्टअप 1 कोटींचा रेव्ह्यून्यू जनरेट करतो. त्याच्या कंपनीत 25 इंजीनिअर्स काम करतात. त्याची कंपनी 200 पेक्षा जास्त कंपनीना आपली सर्विस देते. एडुज़िना, ज़िंगफाई आणि मॅडक्यू सारख्या मोठ्या कंपन्या त्याच्या क्लायंट आहेत. भारतासोबतच दुबई, यूएस आणि जापानमध्येही त्याच्या कंपनीचे क्लायंट आहेत.

बातम्या आणखी आहेत...