आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाने शिक्षण घेऊन नोकरी करावी असे आईला वाटायचे; परंतु शाळेला दांड्या मारून क्रिकेट खेळायचा रसेल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाव : आंद्रे रसेल,

व्यवसाय- जमैकन क्रिकेटपटू,

एकूण मालमत्ता- २०१८ मध्ये अंदाजे ३८ काेटी रुपये होती.   
 

> रसेलबाबत यासाठी हे वाचा

 

वेस्ट इंडीजच्या आंद्रे रसेल याने आयपीएल २०१९ मध्ये आपल्या तुफानी फलदांजी आणि शानदार गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. लहानपण गरिबीत घालवूनही रसेलने केवळ मेहनतीच्या जोरावर हे यश प्राप्त केले.  
आंद्रे रसेलचा जन्म २९ एप्रिल १९८८ रोजी  किंग्जटन, जमेकामध्ये झाला. वडिलांचे नाव  मायकेल रसेल आणि आईचे नाव  सँड्रा डेव्हिस आहे. रसेलचे कुटुंबीय फारच गरीब होते. त्यामुळे आईला वाटायचे की, मुलाने चांगले शिक्षण घेऊन कुठेतरी नोकरीला लागावे; पण लहानपणापासूनच रसेलला खेळात स्वारस्य होते. तो नेमका आईच्या विचाराच्या विराेधात होता. सरकारी शाळेत शिकत असताना तो नेहमीच शाळेला दांड्या मारून मैदानावर क्रिकेट खेळायला जात असे. 


घरातील  खराब आर्थिक परिस्थिती पाहून त्याने शालेय जीवनातच क्रिकेटमध्ये करिअर करण्याचे ठरविले. रसेलला आपल्या घरच्यांनाही नाराज करायचे नव्हते यासाठी त्याने आईकडून दोन वर्षांचा वेळ मागून घेतला. या दोन वर्षांत मी जर या खेळात यशस्वी झालो नाही तर तुला आवडेल ते मी करीन, असे आईला त्याने वचन दिले. 
यादरम्यान क्रिकेटसाठी त्याने दिवस-रात्र एक केला. त्याने आईला जो वेळ दिला होता त्या वेळेत रसेल यशस्वी तर झाला नाही पण त्याची जिद्द पाहून घरच्या लोकांच्या हे तर लक्षात आले की, हा एक ना एक दिवस जरूर यश मिळवेल. यावेळी त्याचे कुटुंबीय त्याच्या बरोबर होते. २००७ मध्ये पहिल्यांदा आंद्रे रसेलला प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये जमैका टीमतर्फे खेळण्याची संधी मिळाली. आपली शानदार फलंदाजी आणि गोलंदाजी यांच्या जोरावर रसेलन लोकांचे मन जिंकले. बरनार्ड्स ग्रीन क्रिकेट क्लबमध्ये आपल्या अष्टपैलू खेळीव्दारे त्याने वेस्ट इंडिजच्या निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले. नोव्हेंबर २०१० मध्ये श्रीलंकेविरूद्ध खेळताना आंद्रे रसेलला पहिल्यांदा वेस्ट इंडीज टीममध्ये सामील केले गेले.  


सर्वसाधारणपणे कोणत्याही नव्या खेळाडूला पहिल्यांदा वन डे किंवा  टी-ट्वेंटी मध्ये सामील केले जाते. पण रसेलला पदार्पणातच कसोटी सामन्यात खेळण्याची संधी दिली गेली. वन-डे मॅचमध्येही तो थेट वर्ल्ड कपमध्येच खेळला. यावेळी त्याची फलंदाजी इतकी खास झाली नाही पण गोलंदाजीमुळे मात्र अनेक जण प्रभावित झाले. पुढच्या अनेक सामन्यांमध्ये आपल्या तडाखेबंद फलंदाजीमुळे  आंद्रे रसेलने स्वत:ला एक पॉवर हिटर म्हणून सिद्ध केले. त्याची अष्टपैलू खेळी पाहून २०१२ च्या आयपीएल सामन्यात त्याला प्रवेश मिळाला. त्याची सुरुवात डेली डेयरडेविल्स संघाकडून झाली होती. २०१२ आणि २०१३ मध्ये डेली डेयरडेविल्स संघाकडून खेळल्यापंतर तो  कोलकाता नाइटराइडर्समध्ये सामील  झाला. २०१४ पासून तो याच टीममध्ये आहे.  आयपीएल आणि  वेस्ट इंडीज टीम शिवाय  बिगबॅश लीग, पाकिस्तान सुपर लीग आणि बांगला देश प्रीमियर लीगप्रमाणे वेगवेगळ्या लीग्जमध्ये खेळतो. 

 

रसेलपासून मिळालेली शिकवण 
१.     यशस्वी होण्यासाठी स्वत:वर हवा पूर्ण विश्वास. 
२.     कठाेर मेहनतीने जीवनात काहीही मिळवता येते. 

बातम्या आणखी आहेत...