आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Success Story Of Krishna Yadav, Own Four Companies

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजीच्या रेसिपी आणि 500 रूपयांतून महिलेने उभ्या केल्या 4 कंपन्या, मैत्रिणीच्या सल्ल्याने घेतली होती छोटीशी ट्रेनिंग...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुग्राम- काही दिवसांपूर्वी 5 राज्यांच्या झालेल्या विधासभा निवडणुकीनंतर सगळ्यांचे लक्ष शेतकऱ्यांच्या कर्ममाफीवर आहे. देशातल्या लाखो शेतकऱ्यांमध्ये आहेत कृष्णा यादव, ज्यांनी फक्त 500 रूपयांपासून सुरूवात केली आणि आता कोटींचा व्यवसाय करणाऱ्या 4 कपंन्या सुरू केल्या.


कृष्णा यादव यांनी असा सुरू केला प्रवास
- कृष्णा यादव यांनी इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की, त्या मुळ बुलंदशहरातील आहेत. त्यांचे पति गोवर्धन यादव यांना बिझिनेसमध्ये नुकसान झाले होते, त्यामुळे ते 1995-96 मध्ये यूपीवरून हरियाणाच्या गुरुग्राममध्ये राहायला आले. येथे त्यांनी छोट्याशा जमिनीच्या तुकड्यावर भाजीपाला उगवणे सुरू केले.

- या तरम्यान 2001 मध्ये एका मैत्रिणीच्या सल्ल्याने कृषि विज्ञान केंद्र, मध्ये खाद्य प्रसंस्करण तंत्रज्ञाचे तीन महिन्याचे प्रशिक्षण घेतले आणि फक्त 500 रूपयांत आपल्या शेतातील भाज्यापासून त्यांनी लोणची बनवण्याची सुरूवात केली.

- कृष्णा यांच्या पतिने रस्त्यावर ते लोणचे विकले. सुरूवातीला लोक त्यांच्यावर हसले पण जेव्हा व्यवसाय चांगला चालायला लागला तेव्हा भरभराटी आली. त्यानंतर 3 हजार रूपये गुंतवुण 100 किलो करवंदाचे लोणचे आणि 5 किलो मिर्चीचे लोणचे तयार केले ज्याला विकून त्यांना 5201 रूपयांचा फायदा झाला.


चांगल्या क्वालिटीसाठी स्वत:च्या शेताचा वापर

- कृष्णा यादव यांनी लोणचे आणि इतर प्रोडक्ट तयार करण्यासाठी घरगुती रेसिपींचा वापर केला. त्यांनी कोणत्याही केमिकल्सशिवाय त्यांचे प्रोडक्ट तयार केले.  हळु-हळु त्यांच्या प्रोडक्टला मागणी आली.

- सगळ्यात आधी त्यांनी त्यांच्या शेतातील गाजर, गोभी, टमाटर आणि आवाळ्याचे लोणचे तयार केले, त्यानंतर दुसऱ्या शेतकऱ्यांकडून फळ भाज्या घेतल्या.

- त्यांच्या या व्यवसायात अनेक महिलांची साथ लाभली आणि त्यांचे प्रोडक्टस वाढत गेले, त्यामुळे त्यांना होलसेलमध्ये ऑर्डर मिळत गेल्या. आता त्यांच्या 4 कंपन्या आहेत आणि त्यांच्या कंपनीत 150 पेक्षा जास्त प्रोडक्ट बनतात.


माजी राष्ट्रपतीपासून ते पंतप्रधानांनी केला आहे सन्मान
- कृष्णा यादव यांना आयसीएआरकडून एनजी रंगा कृषि अवॉर्ड 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या हस्ते मिळाला आहे तर माजी राष्ट्रपति प्रणब मुखर्जी यांनी देखील केले आहे त्यांना सन्मानीत केले आहे. त्याशिवाय शरद पवार यांच्याकडून चॅंपियन अवॉर्ड मिळाला आहे.