आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

टॅक्सी नकाे ओलाने चल, ओलाचे मालक तीन वर्षांपासून करत हाेते पत्नीला राजी

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वर्क-लाइफ या समतोलावर विश्वास
  • दीड वर्षापासून ब्रिटनमध्ये सेवा सुरू

जन्म- २८ ऑगस्ट १९८५ शिक्षण- बीटेक, सीएस (आयआयटी मुंबई) एकूण संपत्ती- ३,१०० काेटी रुपये पत्नी- राजलक्ष्मी कॅब सेवा उपलब्ध करून देणारी देशातील सर्वात मोठी कंपनी ओलाला २०१० मध्ये सुरुवात झाली. भाविश अग्रवाल आणि त्यांचे सहकारी तसेच आयआयटी मुंबईतूनच पदव्युत्तर अंकित भाटी यांनी सुरुवातीला फक्त हॉलिडे ट्रिपसाठी ही सेवा सुरू केली. एका वर्षानंतर त्यांनी भाड्याने कारसेवा सुरू केली. सुरुवातीला भाविशला त्यांची पत्नी राजलक्ष्मी यांना ओलाचा वापर करण्यासाठी राजी करावे लागले. राजलक्ष्मी या मुंबईतील टॅक्सीचा वापर करण्यासाठी तयार होत्या, मात्र ओलाचा नाही.  त्यांचे कुटुंबीयदेखील भाविश यांच्या निर्णयाशी सहमत नव्हते. लुधियानात राहणाऱ्या भाविश यांच्या कुटुंबातील ड्रायव्हरने नोकरी सोडून ओलाशी जुळवून घेण्यासाठी कार खरेदी केली, तेव्हा त्यांच्या आईने ओलाचे अॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड केले. आणि मुलाच्या कामाप्रति विश्वास दर्शवला.  भाविश यांचा जन्म लुधियानात झाला. त्यांचे वडील डॉक्टर आहेत. कुटुंबासोबत त्यांनी काही काळ अफगाणिस्तान व यूकेमध्येही घालवला. इंजिनिअरिंगला अॅडमिशन घेण्यासाठी त्यांनी कोटामध्ये कोचिंग क्लासला जायला सुरुवात केली. नंतर त्यांना आयआयटी मुंबईत प्रवेश मिळाला. पदवीनंतर ते मायक्रोसॉफ्ट इंडियामध्ये रिसर्च इंटर्न होते. यानंतर दोन वर्षे रिसर्च इंडियामध्ये असिस्टंट रिसर्चर होते. यादरम्यान त्यांनी दोन पेटंट मिळवले. तसेच त्यांचे रिसर्च पेपर आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्येही प्रकाशित झाले.  भाविश यांना ओला सुरू करण्याची कल्पना एका प्रवासादरम्यान सुचली. ते बंगळुरू ते बांदीपूर भाड्याने केलेल्या गाडीत प्रवास करत होते. अर्ध्या रस्त्यात म्हैसूरमध्ये चालकाने गाडी थांबवून अजून पैसे मागितले. नकार दिल्यावर त्याने पुुढे न जाण्याची धमकी दिली. चालकाच्या अशा वागणुकीमुळे भाविश यांना उर्वरित प्रवास बसने करावा लागला. या घटनेनंतर भाविश कॅब कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत भाविश सांगतात की, जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मी ट्रॅव्हल एजंट होत आहे असे माझ्या आई-वडिलांना वाटत होते. त्यांना समजावून सांगणे अतिशय कठीण होते. मात्र ओला कॅबला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांचा माझ्यावर ‌विश्वास बसला.  २०१२ मध्ये भा‌विश आणि त्यांचा सहकारी अंकित यांनी फोन ऑन डिमांडवर ओला सेवा सुरू केली. सुरुवातीला ओलाबरोबर जोडून घेण्यासाठी चालकांना राजी करणे अतिशय कठीण होते. यासाठी ते त्यांची गर्लफ्रेंडची (राजलक्ष्मी) कार घेऊन जात होते. सुरुवातीला ते दिवसातून १२ तास काम करायचे.

वर्क-लाइफ या समतोलावर विश्वास 

भाविश तंदुरुस्त राहण्यावर अधिक भर देतात. दररोज स्क्वॉश खेळण्यासह आठवड्यातून दोनदा सायकल चालवतात. ते नो शुगर डाएटचे कठोरपणे पालन करतात. त्यांच्या पत्नी राजलक्ष्मी यांनी एका मुलाखतीत सांगितले, त्या दररोज त्यांना घरातून डबा देतात, कारण त्यांनी बाहेरचे काही खाऊ नये. राजलक्ष्मी यांना कुत्रे पाळण्यास आवडतात, दर रविवारी त्या दोन्ही कुत्र्यांसोबत उद्यानात फिरायला जातात. त्यांना पेट फ्रेंडली रेस्तराँमध्ये नाष्टा करतात. तसेच भाविश यांना फोटोग्राफीची आ‌वड आहे. 

दीड वर्षापासून ब्रिटनमध्ये सेवा सुरू 

जुलै २०१९ मध्ये ओलाला पंधरा महिन्यांचा परवाना मिळाला होता. ओला गेल्या दीड वर्षापासून यूकेतील २८ शहरांमध्ये काम करत आहेत. ओलाने फेब्रुवारी २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियातील पर्थमध्ये व्यवसायाला सुरुवात केली. यानंतर न्यूझीलंड आणि नंतर यूकेमध्ये सेवा सुरू केल्या. ओलाने गेल्या वर्षी जपानच्या सॉफ्ट बँक ग्रुपची १.१ अब्ज डॉलर्सची ऑफर मान्य केली नाही. भाविश यांना कंपनीवर त्यांचा अधिकार कायम ठेवायचा आहे. यासाठी त्यांनी सॉफ्टबँकेकडून ७.६ हजार कोटी रुपये घेण्यास नकार दिला.

0