आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

११०० काेटींच्या विशाल मेगामार्टची फक्त ११ काेटींत विक्री, या भांडवलातून उभी राहिली ८०० काेटींची कंपनी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फाेटाेकाॅपी, फॅब्रिकेशनमध्ये अपयश आल्यावर विशालच्या माध्यमातून सुरू केला रेडिमेड कपड्यांचा व्यवसाय
  • संपूर्ण देशात विशाल मेगामार्टकडे ३.५ हजार कामगार

अमित कुमार निरंजन 

नवी दिल्ली - शारीरिक अक्षमता असतानाही व्यवसाय करण्याची जिद्द अशी काही हाेती की एका छाेट्याशा गार्मेंट दुकानाचे १,१०० काेटी रुपयांच्या विशाल मेगामार्टमध्ये रुपांतर केले. मग अपेक्षा इतक्या वाढल्या की झटपट विस्तार करण्याच्या इच्छेने गडबड झाली. घाईत घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे विशाल मेगामार्ट ताेंडावर आपटली तर त्याची केवळ ११ काेटी रुपयांना विक्री करावी लागली. पण नंतरही हिंमत तुटली नाही. हाती राहिलेल्या तुटपुंजीतून पुन्हा एकता वी टू रिटेल कंपनी उभारली. या वर्षी कंपनीची उलाढाल ८०० काेटी रुपयांना स्पर्श करणार आहे. कंपनीचे संस्थापक रामचंद्र अग्रवालने अशा प्रकारच्या आव्हानांचा सामना करून पुन्हा एकदा स्वत:चे पाय बळकट केले. अग्रवाल म्हणाले की, त्यांचा एक पाय अधू असल्याने त्यांना कुबड्यांची मदत घ्यावी लागते. त्यांनी काेलकात्याच्या सेंट झेव्हियर्स काॅलेजमधून पदवी घेतली. २६ व्या वर्षी नाेकरी केली. एका वर्षानंतर त्यांना जाणवले की आपल्यासाठी नाेकरी नाही. त्यामुळे १९८६ वर्षात त्यांनी फाेटाेकाॅपीचे दुकान सुरू केले. ताेटा झाला तर साॅफ्ट ड्रिंकचे दुकान सुरू केले पण तेही चालले नाही. मग फॅब्रिकेशनमध्ये अपयश आले. नंतर ५० फुटांमध्ये रेडिमेड कंपड्यांचे दुकान सुरू केले. त्यावेळी विक्रीतून १००- २०० रुपये मिळायचे. १९९३ मध्ये विशाल गार्मेंटचे काेलकातामध्ये नाव हाेऊ लागले हाेते. कामगार संघटनांच्या अडचणींमुळे २००३ मध्ये दिल्लीत विशाल मेगामार्ट सुरू केले. अग्रवाल यांच्या मते व्यवसाय सुरू हाेता पण तरी ते परिपक्व झाले नव्हते. झटपट विस्तार करण्याच्या अतिमहत्वाकांक्षेमध्ये जवळपास अर्धा डझन कारखाने सुरू केले हाेेते. २००८ मध्ये कंपनीचा १,१०० काेटीचा व्यवसाय केला. ताेटा इतका वाढला की २०१०-११ मध्ये ११ काेटींत विक्री करावी लागली.दुकानात नाही कामात मन लावले म्हणून विशालच्या विक्रीचे दु:ख झाले नाही


अग्रवाल म्हणाले, माझ्या अपयशातून हे शिकलाे की त्यावेळी घाईगडबडीबराेबरच जबाबदारीची जाणीव नव्हती. आता जबाबदारीची जाणीव आहे. विशाल मेगामार्ट विकल्यानंतर दाेन वर्षांतच वी टू रिटेल नावाची कंपनी सुरू केली. ते म्हणाले, दुकानाशी नाही तर कामावर प्रेम केले म्हणून विशाल मेगामार्ट विक्रीचे फारसे दु:ख झाले नाही. पुढच्या वर्षी ई-काॅमर्समध्ये हाेलसेल आणि रिटेलमध्ये लाँचिंगची तयारी


रामचंद्र म्हणाले, येत्या वर्षी ई-काॅमर्स लाँचिंगची याेजना आहे. आॅनलाइनमध्ये हाेलसेल आणि रिटेल दाेन्ही लाँच हाेईल. व्हॅल्यू रिटेलमध्ये फॅक्टरी सुरू आहे, ज्यात १,५०० लाेक काम करतात. पूर्ण देशात माझ्याबराेबर जवळपास साडेतीन हजार कामगार काम करत आहेत. उत्पादनापासून प्रत्येक चॅनलमध्ये मालाची विक्री करणारे ते एकमेव व्हॅल्यू रिटेलर असावेत.
 

बातम्या आणखी आहेत...