Home | International | Other Country | Successful launching of Nirbhaya satellite

स्वदेशी सबसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र ‘निर्भय’ या वेळी योग्य दिशेने झाले लाँच

वृत्तसंस्था | Update - Apr 16, 2019, 11:40 AM IST

दोनदा चुकलेल्या ‘निर्भय’ची सहाव्यांदा यशस्वी चाचणी

 • Successful launching of Nirbhaya satellite

  नवी दिल्ली- भारताने स्वदेशी सबसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र ‘निर्भय’ ची सोमवारी ओडिशाच्या चांदीपुरात यशस्वी चाचणी करण्यात आली. या क्षेपणास्त्रामुळे भारताचे संरक्षण क्षेत्रातील स्थान अधिक मजबूत होणार आहे. हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (डीआरडीओ) बनवले आहे. आतापर्यंत या क्षेपणास्त्राची सहा वेळा चाचणी झाली; परंतु केवळ एकदाच त्यात पूर्णपणे यश आले. डीआरडीओच्या माहितीनुसार हे क्षेपणास्त्र देशातच बनवले गेले आहे. या वेळेची चाचणी त्याचे बूस्ट व क्रूझ फेजच्या कमी उंचीवर दिशा देण्याची क्षमता तपासण्यासाठी केली गेली. त्यादरम्यान ते निश्चित दिशेने गेले. तसेच कमी उंचीवरील स्वक्षमतेची उत्तम कामगिरी करत सर्व ध्येये गाठली. त्यात क्षेपणास्त्रावर इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टिम, रडार व ग्राउंड टेलिमिट्री सिस्टिमने सतत लक्ष ठेवण्यात आले. ‘निर्भय’ हे सर्व हवामानांत काम करणो क्रूझ क्षेपणास्त्र असून, यामुळे शत्रूच्या रडारपासून वाचत दहशतवादी ठिकाणांना सहजपणे लक्ष्य बनवू शकते. भारताकडे सुपरसोनिक ‘ब्रह्मोस’शिवार आंतरमहाद्वीपीय ‘अग्नी’ क्षेपणास्त्रही आहे.

  सहा वर्षांत झाल्या सहा वेळा चाचण्या
  ‘निर्भय’ ची पहिली चाचणी १२ मार्च २०१३ रोजी घेण्यात आली होती. त्या वेळी या क्षेपणास्त्राने मार्गातच काम करणे बंद केले होते. दुसरी चाचणी १७ ऑक्टोबर २०१४ ला झाली व ती यशस्वी ठरली. तिसरी चाचणी १६ ऑक्टोबर २०१५ झाली. तेव्हा ते १२८ किमीपर्यंत जाऊन दिशा चुकले. चौथी २१ डिसेंबर २०१६ला झाली व तेव्हाही दिशा चुकले. पाचवी २०१७ मध्ये झाली; परंतु त्यात तांत्रिक त्रुटी राहून गेल्या.


  ‘जीएसएलव्ही’च्या चौथा टप्पा सुरू ठेवण्यास मंजुरी
  केंद्र सरकारने भू-स्थितिक प्रक्षेपण यान ‘जीएसएलव्ही’ चा चौथा टप्पा २०२४ पर्यंत सुरू ठेवण्यास सोमवारी मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्लीत झालेल्या एका बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजूर केला. वर्ष २०२१ ते २०२४ साठी असलेल्या या मंजुरीत कमीत कमी पाच ‘जीएसएलव्ही फेज-४’ मोहिमा पूर्ण केल्या जाणार आहेत.


  या संपूर्ण मोहिमेवर एकूण २,७२९.१३ कोटी रुपयांचा खर्च येणार असून, यामुळे भारत दोन टन वजनी उपग्रहांचे प्रक्षेपण स्वत:च करू शकेल. मुख्यत: पृथ्वीची जवळून छायाचित्रे घेणे, देखरेख, डेटा रिले संचार व अंतराळ विज्ञानासाठी कामी येणारे उपग्रह या वजन गटात मोडतात. दरम्यान, देशाची पहिली मानवी अंतराळ मोहीम ‘गगनयान’साठी डेटा रिले संचार उपग्रहाची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठीच वरील मोहिमेला विशेष महत्त्व असेल. या उपग्रहामुळे भारताचे जगभरातील याबाबत पुढे असलेल्या देशांत वजन वाढणार आहे.

Trending