Home | Business | Business Special | successful people never do these things before sleep

झोपण्यापूर्वी चुकूनही हे 5 काम करत नाहीत श्रीमंत लोक, तुम्हीही फॉलो करून होऊ शकता यशस्वी

बिझनेस डेस्क | Update - Sep 06, 2018, 04:39 PM IST

रात्री जेवढी शांत झोप लागेल तेवढे तुम्हाला सकाळी फ्रेश वाटेल. सकाळी फ्रेश उठल्यामुळे दिवसभरातील आव्हानांना तुम्ही सहजपणे

 • successful people never do these things before sleep

  रात्री जेवढी शांत झोप लागेल तेवढे तुम्हाला सकाळी फ्रेश वाटेल. सकाळी फ्रेश उठल्यामुळे दिवसभरातील आव्हानांना तुम्ही सहजपणे सामोरे जाऊ शकता. अमेरिकेचे फेमस लेखक अरि‍आना हफिंगटन यांनी बिझनेस इनसायडरला सांगितले की, झोप न लागणे आणि तणाव किंवा निगेटिव्ह हेल्थचा थेट संबंध आहे. जगातील बहुतांश यशस्वी आणि श्रीमंत लोक झोपण्यापूर्वी काही सवयींपासून दूर राहतात. यशस्वी लोकांच्या मतानुसार आयुष्यात झोपेचेही खास महत्त्व आहे. याच कारणामुळे हे लोक नेहमी शांत झोपेवर फोकस करतात आणि काही सवयींपासून नेहमी दूरच राहतात...


  नंबर-1: दुसऱ्या दिवसाची प्लॅनिंग करायला विसरणे
  दुसऱ्या दिवसाची प्लॅनिंग केल्यास तुमची सकाळ आरामदायक होऊ शकते. बहुतांश यशस्वी लोक रात्रीच दुसऱ्या दिवसाची प्लॅनींग केल्याशिवाय झोपत नाहीत, याउलट अपयशी लोक झोपी जातात. प्लॅनिंग न करता झोपणे दुसऱ्या दिवसाची सुरुवात खराब करू शकते.

 • successful people never do these things before sleep

  नंबर-2:  बेडवर जाण्यापूर्वी टेक्नॉलॉजीसोबत राहणे 
  सामान्यतः अपयशी लोक बेडवर जाण्यापूर्वी आपल्या फोनचा वापर अवश्य करतात. हफिंगटन पोस्‍टचे को-फाउंडर यांनी सांगितले आहे की, प्रत्येक व्यक्तीने बेडवर जाण्यापूर्वी स्क्रीन बंद करावी. ब्राइट ब्ल्यू लाइट तुमच्या मेंदूला प्रभावित करते आणि यामुळे झोपण्यात अडचणी निर्माण होतात. बहुतांश यशस्वी लोक या सवयीपासून दूर राहतात.

 • successful people never do these things before sleep

  नंबर-3:  घडून गेलेल्या गोष्टीचा विचार करणे 
  अपयशी लोक झोपण्यापूर्वी दिवसभरातील निगेटिव्ह गोष्टींचा विचार करतात. असे घडल्यामुळे लोक दुसऱ्या दिवशी जास्त तणावात राहतात. उलट यशस्वी लोकांचा फोकस फक्त दुसऱ्या दिवसाच्या टास्कवर असतो.

 • successful people never do these things before sleep

  नंबर-4:  दुसऱ्या दिवसाची चिंता 
  अपयशी लोक फक्त होऊन गेलेल्या निगेटिव्ह गोष्टींचा विचार करत नाहीत तर दुसऱ्या दिवसाच्या चिंतेतही राहतात. प्रत्येक व्यक्तीने झालेल्या गोष्टीचा विचार करणे चांगले आहे परंतु तुम्ही दररोज झोपण्यापूर्वी भविष्याचा विचार करत राहणे हा वाईट संकेत आहे. तुम्ही निगेटिव्हिटी तुमच्या विचारांना प्रभावित करते. हे विचार यशाच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करतात.

 • successful people never do these things before sleep

  नंबर-5: स्वच्छतेकडे लक्ष आवश्यक
  झोपण्यापूर्वी स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. उदा. ब्रश करणे किंवा शॉवर घेणे. स्वतःची उपेक्षा करू नये. अपयशी लोक रात्री करण्यात येणारी कामे नियमीतपणे करत नाहीत. असे न केल्यास तुम्ही स्वतःला यशापासून दूर ढकलत आहात. तुम्ही स्वतःकडे लक्ष दिले नाही तर लक्ष्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत.

Trending