आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अारोपी निष्पन्न करून गुन्हे उघडकीस अाणण्यात समाधानकारक यश; मात्र गुन्हेगारीवर आळा बसवण्यात अपयश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना-गुन्हा घडल्यानंतर आरोपी निष्पन्न करून तत्काळ अटक करणे, गुन्हेगारीवर नियंत्रण आणून नागरिकांना भयमुक्त करणे ही पोलिस प्रशासनाची जबाबदारी आहे. दरम्यान, जिल्ह्यात घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. परंतु दिवसेंदिवस गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून वर्षाकाठी ३ हजारांच्या आसपास विविध प्रकारचे गुन्हे घडतात. यातील बहुतांश गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश येत आहे, परंतु गुन्ह्यांची संख्या मात्र त्या प्रमाणातच राहत असल्यामुळे गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी प्रशासन मात्र अपयशी ठरत आहे. याबाबत विशेष पोलिस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांनी शुक्रवारी 'गुन्हे परिषद' घेऊन गुन्ह्यांचा आढावा घेऊन पोलिसांना प्रलंबित गुन्ह्यांचा तपास लावण्याच्या सूचना केल्या आहेत. 


जिल्ह्यात वर्षाला तीन हजारांच्या जवळपास गुन्हे घडतात. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध, बलात्कार, दरोडा, जबरी चोरी, चैन स्नॅचिंग, घरफोडी, जनावर चोरी, वाहन चोरी, पळवून नेणे, विनयभंग यासह विविध प्रकारचे गुन्हे घडतात. सातत्याने असे गुन्हे घडत राहिल्यास नागरिकांमध्ये भयभीत वातावरण होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून गुन्ह्यांच्या तपासासह गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यासाठीही प्रयत्न केले जाते. या पार्श्वभूमीवर दरवर्षी विशेष पोलिस महानिरीक्षकांकडून गुन्हेगारीच्या घटनांचा आढावा घेतला जाऊन त्याबाबत समाधानकारक कार्य नसल्यास संबंधितांना नोटिसा दिल्या जातात. दरम्यान, शुक्रवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय अधिकारी शिलवंत ढवळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, विशेष कृती दलाचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांच्यासह जिल्ह्यातील १८ पोलिस ठाण्यांमधील पोलिस निरीक्षक, उप पाेलिस निरीक्षक आदींच्या उपस्थितीत मुत्याल यांनी आढावा घेतला. या आढाव्यात जिल्ह्यातील गुन्हेगारीबाबत, प्रलंबित गुन्हे याबाबत सविस्तर आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. 


दोन दिवसांपासून मुत्याल हे जालना शहरात दाखल झाले आहेत. त्यांनी विविध प्रकारची माहिती घेऊन जिल्हा गुन्हेगारीमुक्त कसा होईल, यादृष्टीने पोलिसांनी काम करावे, अशा सूचना दिल्या आहेत. गुन्ह्यांचे प्रमाण घटवा, प्रलंबित असलेल्या घटनांचा तत्काळ तपास लावा, आरोपींना अटक करा, अशा सूचनाही त्यांनी याप्रसंगी दिल्या आहेत. दरम्यान, गुन्हेगारीवर नियंत्रण बसवण्यासाठी पोलिस प्रशासनाने तंटामुक्त समित्या, गाव पातळीवर पोलिस मित्र अशा प्रकारच्या विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. अनेक गुन्ह्यांत पोलिसांनी आरोपींना मोक्कासारखी कारवाई केली आहे. याबाबतही मुत्याल यांनी आढावा घेऊन अजून दोन दिवस विविध आढावा घेतला जाणार आहे. सध्या दुष्काळजन्य स्थिती असल्यामुळे भुरट्या चोऱ्या होऊ नये, म्हणून पोलिसांनी सतर्क राहावे, अशाही सूचना दिल्या आहेत.

 
चार तास गुन्ह्यांचा आढावा 
गुन्हे परिषदेसाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षकांची दुपारी १२ वाजेपासून ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध गुन्ह्यांबाबतचा आढावा घेत जे गुन्हे प्रलंबित असतील त्याबाबत सविस्तर माहिती घेऊन संबंधित पोलिस ठाण्यांच्या पोलिस निरीक्षकांना सूचना केल्या आहेत. 


कर्मचाऱ्यांच्या अडी-अडचणी घेतल्या समजून 
वर्षनिहाय जिल्ह्यात घडलेले गुन्हे; लागलेल्या तपासाची उघड संख्या 
वर्ष खून गुन्हे उघड 
२०१६ ४५ ३१३० २६७२ 
२०१७ ३९ ३१८७ २५७९ 
२०१८ २४ २३०१ १९८४ 
स्त्रोत : पोलिस अधीक्षक कार्यालय, जालना. 
पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिस अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा करून विशेष पोलिस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांनी कर्मचाऱ्यांशीही संवाद साधून त्यांच्या अडी-अडचणी समजून घेतल्या. 


महिला अत्याचाराबाबत आदेश 
जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचार, खुनांच्या घटना, विनयभंग याबाबत आढावा घेतला. यातील जे गुन्हे प्रलंबित आहेत. त्या गुन्ह्यांचा तत्काळ तपास लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. वर्षाकाठी विनयभंगाच्या २०० घटना घडत आहेत. त्याबाबत गांभीर्याने घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. 
पोलिस अधीक्षक एस.चैतन्य यांना सूचना करताना विशेष पोलिस महानिरीक्षक प्रकाश 

बातम्या आणखी आहेत...