आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हास्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किती तरी दुःख हास्यातून लपवता येते. हास्य हे जीवन कौशल्य आहे. निर्मळ मनाचे प्रतीक आहे. जी व्यक्ती खळखळून हसते त्याच्या अंतःकरणात द्वेषरूपी कलुषित भावना नसते. मनातल्या साऱ्या भावना चेहऱ्यावरील हास्य दर्शवते. हास्य मनाचे दर्पण आहे त्यांत आनंद प्रतिबिंबित होतो. इतरांना हसवावे.  स्वतः ही दिलखुलास हसावे ही आनंदी राहण्याची गुरुकिल्ली आहे. हास्य मनातलं मळभ दूर करतं. निसर्गाच्या कणाकणात हास्य लपलेले आहे. फुलांचे आणि मुलांचे हास्य, फेसाळणाऱ्या समुद्राच्या लाटाचे, खळखळत वाहणाऱ्या नदीचे, झुळझुळ वाहणाऱ्या निर्झराचे असे हे हास्य जीवनातील दुःख विसरायला लावणारे औषध आहे. बालपणी उन्हाळ्याच्या सुट्यात जमलेल्या भावंडांमधे चिडक्या बिब्याचा राग छू मंतर करण्यासाठी हसवणं हे एकच औषध माहिती होतं.
पण हल्ली हे हसणंही महाग झालंय. अनोळखी तर सोडाच, पण ओळखीचे मित्रसुद्धा भेटल्यावर किंचितसं हसत नाहीत.  एका गावात राहून, महिनामहिना भेटी नाहीत. ख्यालीखुशाली - विचारपूस नाही. भेटीचा खरा आनंद नाही. आनंदात गालावर निखळ हास्य नाही. सगळे तणावात वावरताहेत. चेहऱ्यावर बेगडी हास्य घेऊन. म्हणूनच जीवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर हास्याचं है वैभव परत मिळवायलाच हवं. कारण आयुष्य पुन्हा पुन्हा येत नाही. आपल्यामुळे कोणाच्या चेहऱ्यावर हास्याची कळी उमलण्यासाठी प्रयत्न करा.

बातम्या आणखी आहेत...