आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-  विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. रोहित बाबू डोंगरे (१७, रा. आरेफनगर, जटवाडा रोड) असे त्याचे नाव आहे. तो मौलाना आझाद महाविद्यालयात अकरावीत शिक्षण घेत होता. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.

 

बुधवारी सकाळीच त्याचे आईवडील कामानिमित्त घराबाहेर पडले होते. मोठा भाऊ शरद पत्नीसह रुग्णालयात गेला होता. रोहित एकटाच घरी होता. त्याने छताला ओढणीने गळफास घेतला. काही वेळाने घरी परतलेल्या कुटुंबीयांच्या हा प्रकार निदर्शनास आला. बेशुद्धावस्थेतील रोहितला त्यांनी घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. बेगमपुरा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून जमादार व्ही. के. निकम तपास करत आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...