आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी सावळ्या रंगामुळे रडायची ही तरुणी, आज लाखांत आहे फॅन फॉलोइंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : सूडानची ही तरुणी एकेकाळी आपल्या सावळ्या रंगामुळे रडायची. पण आज दिवस पालटले आहेत. आज या तरुणीने मॉडेलच्या रुपात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले असून तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. एकेकाळी रिफ्युजी कॅम्पमधील मुले सावळ्या रंगामुळे तिला चिडवत असत. या तरुणीचे नाव याकिम असून ती 25 वर्षांची आहे. याकिमचे इन्स्टाग्रामवर तब्बल 325,000 फॉलोअर्स आहेत. याशिवाय ती एक वकील आहे. जी वर्णभेदाविरोधात आवाज उठवते.

 

अतिशय हलाखीच्या परिस्थितीत गेले याकिमचे बालपण...
याकिमचे बालपण यूथोपिया आणि केन्याच्या रिफ्यूजी कॅम्पमध्ये गेले. याकिम सांगते, बालपणी मला पोटभर जेवण मिळत नसे. कधीकधी तर पोट भरण्यासाठी पिण्याची पाणीही मिळायचे नाही. वयाच्या 14 व्या वर्षी याकिम अमेरिक गेली. तिथे ती शाळेत जाऊ लागली. शाळेतसुद्धा मुले तिच्या सावळ्या रंगावरुन तिची खिल्ली उडवायचे. तू अंघोळ करत नाहीस का, असा प्रश्न तिला मुले विचारायचे.

 

आज टॉप मॉडेल आहे याकिम..
याकिमने आज मॉडेलिंगच्या दुनियेत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. ती म्हणते, की तुम्ही सावळे असा की गोरे, स्वतःवर तुम्ही प्रेम करायला हवे.

 

पुढील स्लाईड्सवर बघा, टॉप मॉडेलचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...